नगरनियोजन खात्यासंदर्भात पुराव्यासह तक्रारी द्या : विश्वजीत राणे

माहिती पाठविण्यासाठी नागरिकांसाठी ई-मेल उपलब्ध : राणे
Vishwajit Rane
Vishwajit RaneDainik Gomantak

पणजी : नगरनियोजन खात्याअंतर्गत झालेल्या बेकायदा जमीन घोटाळ्याची पुराव्यानिशी तक्रार द्या, असे आवाहन नगरनियोजन खात्याचे मंत्री विश्वजीत राणे यांनी मंगळवारी केले.

Vishwajit Rane
‘सिंडिकेट’ घोटाळा 500 कोटींचा!

याबाबत मंत्री राणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात अनेक ठिकाणी बेकायदा हस्तांतर, संवेदनशील जागेतील डोंगरकापणी, संरक्षित जागांवरील अतिक्रमण अशा अनेक घटना समोर आल्या आहेत. याबाबत नगरनियोजन खात्याने नेमलेल्या समितीकडे अनेक तक्रारी आल्या आहेत. तज्ज्ञ समितीमार्फत या संपूर्ण प्रकरणांची चौकशी सुरू आहेच, याशिवाय राज्यात कुठेही अशा प्रकारची जमिनींच्या संदर्भात बेकायदा प्रकार घडत असल्यास vishwajitraneoffice@gmailcom या ई-मेल पत्त्यावर पुराव्यानिशी छायाचित्रांसह माहिती द्यावी, असे राणे म्हणाले.

Vishwajit Rane
गोव्यात कोरोनाचे नवे 135 बाधित ; एक रुग्णालयात

नगरनियोजन खात्याने राज्यातील बेकायदा कृतींचे उच्चाटन करण्यासाठी आठ ओडीपी आणि नियोजित मसुदे निलंबित केले आहेत. खात्याअंतर्गत नेमलेल्या तज्ज्ञ समितीमार्फत या व्यवहारांची सखोल चौकशी सुरू आहे. अशातच आता मंत्री राणे यांनी आपला ई-मेल लोकांसाठी उपलब्ध केल्याने तक्रारीत वाढ होण्याची शक्यता आहे.

ईमेलद्वारे माझ्याकडे आलेल्या तक्रारींचे तज्ज्ञ समितीकडून चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याचे आश्वासन समस्त गोवेकरांना आपण देत आहे. जेणेकरून यापुढे अशा प्रकारच्या घटना घडू नयेत आणि राज्य सुजलाम - सुफलाम राहील, यासाठी नगरनियोजन खात्याचे प्रयत्न निरंतर सुरूच राहतील.

- विश्वजीत राणे, नगरनियोजन मंत्री

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com