पालकांनी मुलांना आवर घाला; ही पार्ट्या करण्याची वेळ नाही

Vishwajit Rane Goa.jpg
Vishwajit Rane Goa.jpg

पणजी: कोरोना संक्रमणाच्या दुसऱ्या लाटेत देशातील परीस्ठीती दिवसेंदिवस चिंताजनक होत जाताना दिसते आहे. गोव्यात सुद्धा आता कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना काल दिवसभरात 940 रुग्ण आढळून आले आहेत. राज्यातील आरोग्य यंत्रणा कोरोना संक्रमण नियंत्रणात आणण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करत असताना नागरिकांनी देखील नियमांचेपालन करणे आवश्यक झाले आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री  विश्वजित राणे यांनी नागरिकांना कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. (Vishwajit Rane Rani said don't party when the corona has created a serious situation.)

कोरोना परिस्थितीमध्ये काम करताना डॉक्टरांवर मोठ्या प्रमाणात ताण निर्माण झाला आहे. या परिस्थितीमध्ये तरुणांनी हे लक्षात घेतले पाहिजे की, ही पार्ट्या करण्याची वेळ नाही असे म्हणत आरोग्यमंत्री (Health Minister) विश्वजित राणे यांनी तरुणांना घरातच थांबण्याचे आवाहन केले आहे. तर पालकांनी देखील  गांभीर्य लक्षात घेऊन आपल्या मुलांना पार्ट्या करण्यासाठी बीचवर जाऊ देऊ नये असे त्यांनी पुढे सांगीतले आहे. तसेच किमान पुढील एक महिन्यासाठी तरी जलतरण तलाव बंद करून, हॉटेल आणि जिम अर्ध्या क्षमतेवर चालवले जावेत असे आपले वैयक्तिक मत असल्याचे विश्वजित राणे (Vishwajit Rane) स्पष्ट केले आहे. 

दरम्यान, नॉर्थ गोव्यात (North Goa) कलम 144 अंतर्गत गर्दी करण्यावर काही प्रमाणात निर्बंध लागू करण्यात आले असून मास्क वापरणे, सोशल डिस्टंसिंगचे पालन करणे यांसाख्या नियमांव्यतिरिक्त इतर कुठलेही कडक निर्बंध लागू करण्यात आलॆले नसल्याचे समजते आहे. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com