गोव्यातील कोरोना नियंत्रित राहण्यासाठी नवी एसओपी जाहीर करणार

Vishwajit rane said Corona in Goa will announce a new SOP to stay in control
Vishwajit rane said Corona in Goa will announce a new SOP to stay in control

पणजी: राज्यात कोरोना नियंत्रित राहावा, यासाठी विद्यमान एसओपीमध्ये सुधारणा करून नवी एसओपी जाहीर करण्यात येणार आहे. त्याचबरोबर कोरोनासंदर्भातील तपासण्याची संख्याही वाढवली जाणार आहे. राज्यातील 60 वर्षावरील नागरिकांनी मोठ्या संख्येने कोविड प्रतिबंधक लस घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. अशी माहिती आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी आज 
दिली.(Vishwajit rane said Corona in Goa will announce a new SOP to stay in control)

पणजी येथे आज आरोग्यमंत्र्यांनी आरोग्य क्षेत्रातील तज्ञ समितीची बैठक घेतली. राज्यात कोरोना नियंत्रणासाठी आणखी काय करता येईल, यावर विचार विनिमय केला. या बैठकीला सरकारी व खाजगी क्षेत्रातील तज्ञ डॉक्टर व अधिकारी उपस्थित होते. या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत आरोग्यमंत्र्यांनी वरील माहिती दिली. यावेळी आरोग्य खात्याचे सचिव रवी धवन, आरोग्य खात्याचे संचालक डॉ. जुझे डिसा, गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर व इतर तज्ञ डॉक्टर उपस्थित होते. ज्या राज्यात दुसऱ्या राज्यातील लोकांकडून कोविड तपासणीचे प्रमाणपत्र मागितले जाते.

त्या राज्यातील लोकांकडून गोव्यातही कोविड तपासणीचे प्रमाणपत्र घेतले जावे, असे आपले मत आहे. नवीन एसओपी, मास्क न घालणाऱ्यांच्या दंडात वाढ करणे, इतर विषयावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी दोन दिवसात चर्चा करून योग्य ते निर्णय घेतले जातील, असे राणे यांनी सांगितले. जे रेस्टारेंट चालक व हॉटेल चालक कोरोना नियमावलींचे पालन करत नाहीत, त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगून गेल्या वर्षी याच दिवसात राज्यात कोरोना पसरला होता. त्यामुळे नागरिकांनी  कोरोना नियमावलींचे पालन करणे गरजेचे असल्याचे राणे यांनी 
सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com