गोव्यातील सर्व पालिकांना यापुढे ऑडिट अनिवार्य

विश्‍वजीत राणेंची माहिती; विकास प्रकल्पांचा आढावा घेऊनच निधी देणार
Vishwajit Rane on Municipal Audit
Vishwajit Rane on Municipal AuditDainik Gomantak

पणजी : पंधराव्या वित्त आयोगानुसार राज्यातल्या सर्व पालिकांनी ऑडिट करणे अनिवार्य असून येत्या 30 दिवसांत ते करावे. याशिवाय पालिकांमार्फत उभारल्या जाणाऱ्या विकास प्रकल्पांचाही आढावा घेऊन मगच यानंतरचा निधी दिला जाईल अशी माहिती शहर विकास आणि नगर नियोजन मंत्री विश्‍वजीत राणे यांनी दिली.

शहर विकास खात्याचे सचिव रमेश वर्मा, संचालक गुरुदास पिर्लनकर व राज्यातील सर्व पालिकांचे मुख्याधिकारी यांच्यात विविध विषयांवर बैठक झाली. राणे म्हणाले, ‘15 व्या वित्त आयोगानुसार पालिकांना ऑडिट अनिवार्य आहे. विविध प्रकल्पांचा विनियोग प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. अनेक प्रकल्पांवर ज्या पद्धतीने खर्च होत आहे. त्या प्रमाणात या प्रकल्पातून मिळणारा महसूल व खर्चात ताळमेळ नसल्याने पालिकांना अतिरिक्त निधीची आवश्यकता भासते.

Vishwajit Rane on Municipal Audit
बांधकाम नियमितीकरणाचे 90 टक्के अर्ज निर्णयाविना

जन्म-मृत्यू प्रमाणपत्र ऑनलाईन

आठवड्याभरात जन्म-मृत्यू प्रमाणपत्र ऑनलाईन मिळतील. याची सुविधा सरकारच्या वतीने केली जाईल. यासाठी आता नागरिकांना संबंधित पालिकांना फेऱ्या घालाव्या लागणार नाहीत. हे प्रमाणपत्र त्यांना घरपोच मिळतील. यावर संबंधित अधिकाऱ्यांची डिजिटल स्वाक्षरी मिळेल, अशी माहिती मंत्री विश्वजीत राणे यांनी दिली.

यापुढे पालिकांना विनियोग प्रमाणपत्र साधन सादर करणे बंधनकारक आहे. या प्रकल्पांमधूनही महसूल उभा करणे गरजेचे आहे. अशा सर्व प्रकल्पांचा आढावा येत्या काही दिवसांत घेतला जाईल. आणि त्या आधारित पुढील निधी देण्याबाबत विचार केला जाईल, अशी माहिती विश्‍वजीत राणे यांनी दिली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com