वनखात्याच्या सीमा स्थानिकांसाठी खुल्या करणार

विश्वजीत राणेंची सांगेत आयोजित केलेल्या महिला सशक्तीकरण मेळाव्यात ग्वाही
वनखात्याच्या सीमा स्थानिकांसाठी खुल्या करणार
Vishwajit Rane Dainik Gomantak

केपे : वनखात्याच्या सीमा गेट घालून किंवा कुंपण घालून बंद करून काहीच साध्य होणार नाही उलट लोकांना जंगलात प्रवेश देऊन जंगलाचा अनुभव घेण्याचा हक्क सर्वांनाच असल्याचं मत वनमंत्री विश्वजित राणे यांनी मांडलं आहे. जंगलात राहणाऱ्या लोकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे आणि यासाठी त्याचे जीवनमान सुधारण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही राणेंनी स्पष्ट केलं आहे.

वन खात्याच्या सीमा कुंपण घालून बंद करण्यात आलेल्या आहेत. हे प्रकार यापुढे चालणार नाहीत असा इशारा आरोग्य आणि वन मंत्री विश्वजित राणे यांनी दिला आहे.ते सांगे येथे पंचायत सभागृहात अयोजित करण्यात आलेल्या महिला सशक्तीकरण मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

दक्षिण गोव्यातील लोकांना बऱ्याच कारणासाठी आणि गंभीर रोगांवर उपाय करण्यासाठी गोमेकॉत धाव घ्यावी लागत होती. त्यासाठी दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात कार्डिअॅक विभाग सुरु करण्यात आला आहे. लवकरच जिल्हा इस्पितळात न्युरोलॉजी विभागही सुरु करण्यात येणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे अपघातात जखमी झालेल्या रूग्णांवर इथेच उपचार होऊ शकणार आहेत.

लोकांच्या आरोग्याच्या प्रती हे सरकार संवेदनशील असल्याचे त्यांनी सांगितले. निवडणुकीपूर्वी विरोधक तसेच अनेक लोक यावेळी भाजपाला एकेरी आकड्यावर समाधान मानावे लागेल असे सांगत होते तसेच बराच अपप्रचार सुद्धा अमच्याविरुध्द सुरू केला होता.पण आम्ही लोकांच्या नेहमी संपर्कात राहिलो, सरकारच्या सर्व योजना लोकांपर्यँत पोचवल्या म्हणून लोकांनी भाजपला बहुमत दिले असे दावाही त्यांनी केला.

कोरोनाच्या वेळी मी आणि मुख्यमंत्री मास्क घालून घरी बसलो असतो तर आज कोरोना संपला नसता. ब्लॅक फंगसचा धोका असतांना सुद्धा आपण इस्पितळात जाऊन लोकांच्या उपचाराबाबत चौकशी करत होतो, असंही त्यांनी सांगितलं. वनात राहणाऱ्या लोकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. वातानुकूलित कक्षात बसून त्यांच्या समस्या सोडवणे शक्य नाही. त्यासाठी आपण खोतीगाव राखीव वनक्षेत्रात वास्तव्य करून आदिवासी बांधवांशी चर्चा करणार आहे, असे त्यांनी सांगितले.

Vishwajit Rane
कोंडी फुटणार; झुआरी पूल जुलैअखेरपर्यंत वाहतुकीसाठी खुला करणार

वन खात्याच्या जमिनीत त्यांना उत्पन्न घेता येते पण आज पर्यंत त्या कायद्याची आम्हीं अंमलबजावणी केलेली नाही. खास बैठक घेऊन आदिवासींची सतावणूक करू नये अश्या सुचना आपण वनअधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत असे विश्वजीत राणे यांनी सांगितले आहे.

जनतेला वनात जाऊन जंगलाचा अनुभव घेण्याचा अधिकार आहे. राखीव वन क्षेत्राच्या गेट बंद करून ठेवल्या जात आहे.वन खात्याच्या सीमा कुंपण घालुन बंद करण्यात आलेल्या आहेत.हे प्रकार यापुढे चालणार नाहीत असा इशारा त्यांनी दिला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com