गोव्यात दुसऱ्या दिवशीही ‘व्हीआय’चे नेटवर्क बंदच

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 17 ऑक्टोबर 2020

व्होडाफोन आणि आयडिया कंपनीची सेवा घेणारे लाखो ग्राहक गोव्यात आहेत. त्यांना काल (गुरुवारी) नेटवर्कमुळे समस्येला तोंड द्यावे लागले होते.

पणजी- राज्यात आज दुसऱ्या दिवशीही  ‘व्हीआय’ या कंपनीच्या नेटवर्कची समस्या कायम राहिली. सायंकाळी चारच्या सुमारास या सेवेत काहीशी सुधारणा झाल्याने काही भागात नेटवर्क सुरू झाल्याचे दिसून आले. ]

ऑनलाईन शिक्षणात नेटवर्कची समस्या उद्भवल्याने पालक आणि विद्यार्थी वर्गात नाराजी व्यक्त होत होती. व्होडाफोन आणि आयडिया कंपनीची सेवा घेणारे लाखो ग्राहक गोव्यात आहेत. त्यांना काल (गुरुवारी) नेटवर्कमुळे समस्येला तोंड द्यावे लागले होते. महाराष्ट्रातही सेवा खंडित झाली होती. गोव्यात नेटवर्क सेवा सुरू होईल, या आशेत लोक होते. परंतु रात्रीही ती सेवा सुरू झाली नाही. 

आज सकाळी कालच्याप्रमाणेच लोकांना अनुभव आला. ज्यांच्याकडे व्हीआय सोडून इतर मोबाईल व इंटरनेट सेवा देणाऱ्या कंपन्यांचे सीम कार्ड असल्यामुळे सकाळी मुलांना त्या कार्डद्वारे क्लासेसला जोडून देण्यात आले. अनेक पालकांनी शिक्षकांकडे नेटवर्कची समस्या असल्याच्या तक्रारीही केल्या.

मोबाईलवरून ऑनलाईन शिक्षण दिले जात असल्याने विविध कंपन्या आपली नेटवर्क सेवा अतिवेगवान असल्याच्या जाहिराती करते. कोट्यवधी रुपये या जाहिरातींवर कंपन्या खर्च करतात, पण एखाद्या दिवशी नेटवर्कमुळे लोकांची काय हालत होते आणि लोक कशापद्धतीने प्रतित होतात, हे काल कंपन्यांना पाहायला मिळाले आहे.
 महाराष्ट्र आणि गोवा एकच सर्कल मोलाईल सेवेसाठी निश्‍चित असल्याने महाराष्ट्रात या सेवेत बिघाड झाल्यास त्याचा परिणाम गोव्यातही होत 
असतो.

संबंधित बातम्या