'कोरोना'च्या सावटाखाली होत असलेल्या गोवा जिल्हा पंचायत निवडणूकीच्या मतदानासाठी मतदारांमध्ये निरूत्साह

दैनिक गोमन्तक
शनिवार, 12 डिसेंबर 2020

गोवा जिल्हा पंचायत निवडणूकीच्या मतदानाला आज सकाळी ८ वाजल्यापासून सुरूवात झाली. सासष्टीतील कोलवा, बाणावली, नुवे, राय, गिरदोली, कुडतरी, दवर्ली, वेळ्ळी या  आठ मतदारसंघांमध्ये धीम्यागतीने मतदान सुरू आहे.

मडगाव : गोवा जिल्हा पंचायत निवडणूकीच्या मतदानाला आज सकाळी ८ वाजल्यापासून सुरूवात झाली. सासष्टीतील कोलवा, बाणावली, नुवे, राय, गिरदोली, कुडतरी, दवर्ली, वेळ्ळी या  आठ मतदारसंघांमध्ये धीम्यागतीने मतदान सुरू आहे. राज्यात सकाळी ११ वाजेपर्यंत पर्यंत जवळपास १५ टक्के मतदानाची नोंद झाली. सकाळी १० वाजेपर्यंत उत्तर गोव्यात १२.२९ टक्के तर दक्षिण गोव्यात १२.२३ टक्के मतदानाची नोंद झाली.

 

मतदान केंद्रात जाणाऱ्या मतदाराने मुखावरण वापरणे बंधनकारक आहे. अन्यथा मतदान केंद्रात प्रवेश मिळणार नाही. मतदान केंद्राच्या प्रवेशद्वारावर मतदाराच्या शरीराचे तापमान थर्मन गनने तपासले जात आहे. ते मर्यादेत असल्यास त्या मतदाराला मतदान केंद्रात प्रवेश दिला जात आहे. शरीराच्या तापमानाने मर्यादा ओलांडल्यास तेथील मंडपातच मतदाराला सावलीत १० मिनिटे बसवले जाणार आहे. त्यानंतर पुन्हा शरीराचे तापमान नोंदवले जाणार आहे. ते मर्यादेत असल्यास मतदान करण्यास जाऊ दिले जाईल किंवा दुपारी चार नंतर मतदानास येण्याचा सल्ला दिला जात आहे.

 

अधिक वाचा :

डिचोली तालुक्यात जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी शांततेत मतदान 

दक्षिण गोव्यातील ९६ उमेदवारांचे भवितव्य आज होणार सीलबंद

गोव्यातील मुस्लिम बांधवांत भीती निर्माण करण्याचा प्रयत्न: शेख जीना 

संबंधित बातम्या