म्हापशात भाजप नगरसेवकाला मतदारांकडूनच मारहाण!

गोमंन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 11 मे 2021

दंगामस्ती आणि अरेरावी केल्याचे कारण पुढे करून म्हापसा पालिकेच्या खोर्ली भागातील प्रभागातू्न निवडून आलेले भाजपसमर्थक नगरसेवक स्वप्नील शिरोडकर यांना खुद्द त्यांच्याच प्रभागातील काही मतदारांनी मारहाण केल्याची घटना रविवारी रात्री सुमारे दहाच्या सुमारास घडली.

म्हापसा: दंगामस्ती आणि अरेरावी केल्याचे कारण पुढे करून म्हापसा(mapusa) पालिकेच्या खोर्ली भागातील प्रभागातू्न निवडून आलेले भाजपसमर्थक(BJP) नगरसेवक स्वप्नील शिरोडकर(Corporator Swapnil Shirodkar) यांना खुद्द त्यांच्याच प्रभागातील काही मतदारांनी मारहाण केल्याची घटना रविवारी रात्री सुमारे दहाच्या सुमारास घडली.(Voters beaten by Mapusa BJP corporator )

या घटनेसंदर्भात म्हापसा पोलिस स्थानकात संदीप बाळकृष्ण कर्पे यांनी स्वप्नील शिरोडकर, त्यांचे बंधू विशाल शिरोडकर व सचिन शिरोडकर यांच्या विरोधात तक्रार सादर केली आहे. पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा म्हणून भारतीय दंड संहितेच्या 504 व 523 या कलमांखाली या घटनेची नोंद केली आहे. दरम्यान, पालिका निवडणुकीत त्या प्रभागात पराभूत झालेल्या उमेदवार तथा म्हापशाच्या माजी उपनगराध्यक्ष विजेता नाईक यांनीही शिरोडकर कुटुबीयांच्या विरोधात तक्रार सादर केली आहे.

मुख्यमंत्र्यांना गोव्यापेक्षा महाराष्ट्रातील नागरिकांचीच जास्त काळजी 

उपलब्ध माहितीनुसार, विजेता नाईक यांच्या घरी कर्पे कुटुंबीय गेले असता नाईक यांच्या घरासमोर कर्पे कुटुबीयांनी कारगाडी पार्क केल्याच्या प्रश्नावरून हा वाद उद्भवला. त्यावेळी झालेल्या वादावादीनंतरच्या झटापटीत दोन्ही गटांत हाणामारी झाली व त्यावेळी कर्पे कुटुबीयांनी नगरसेवक स्वप्नील शिरोडकर व त्यांच्या कुटुबीयांना मारहाण केली. या घटनेत दोन्ही गटांतील व्यक्तींना मारहाण झाली. त्यानंतर पोलिसांना पाचारण केले असता, नगरसेवक स्वप्नील शिरोडकर व त्यांचे बंधू विशाल यांनी पोलिसांना ढकलल्याने पोलिसांनीही शिरोडकर यांना मारहाण केली असा दावा श्रीकांत कर्पे यांनी केला.

कडक निर्बंधांचा सकारात्मक परिणाम; डिचोलीत कोविड सक्रिय रुग्णसंख्येत घट 

त्यानंतर पोलिसांनी शिरोडकर कुटुबीयांना पोलिस स्थानकात नेले व नंतर रात्री दोन-अडीचच्या सुमारास त्यांना सोडून दिले. या प्रकरणी अद्याप कुणालाही अटक करण्यात आले नाही. दरम्यान, या घटनेमुळे माझा भाऊ संदीप याच्या नाकाला दुखापत झाली असून, त्यासंदर्भातील वैद्यकीय अहवाल आल्यानंतरच आपण त्याबाबत वकिलाच्या साहाय्याने पुढील कार्यवाही करणार आहे, असे श्रीकांत कर्पे यांनी या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. या घटनेसंदर्भात स्वप्नील शिरोडकर यांच्याशी संपर्क साधला असता आपल्याला कुणाकडूनही मारहाण झाली नाही, असा दावा त्यांनी केला.
 

संबंधित बातम्या