महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाची केन्द्रीय समिती निवडण्यासाठी आज पणजीत मतदान

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 16 जानेवारी 2021

महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाची केन्द्रीय समिती निवडण्यासाठी आज पणजीत मतदान सुरू आहे.

पणजी: महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाची केन्द्रीय समिती निवडण्यासाठी आज पणजीत मतदान सुरू आहे. या पक्षाचे 999 सदस्य मतदान करणार आहेत पक्षाचे सध्याचे अध्यक्ष दीपक ढवळीकर आणि निलेश पटेकर यांच्यात अध्यक्षपदासाठी सामना आहे.

पक्षाच्या खजिनदारपदी अनंत नाईक यांची बिनविरोध निवड झाली आहे. सायंकाळी पाच वाजेपर्यंत मतदान सुरु राहणार आहे. कार्याध्यक्ष पदासाठी प्रताप फडते, हेमंत पिळगावकर उपाध्यक्षपदासाठी अमृत आगरवाडेकर, किशोर परवार, कृष्णनाथ दिवकर, कार्यकारणी सदस्य पदासाठी सुदीप कोरगावकर फ्रान्सिस लोबो, प्रभाकर मुळीक, श्रीपाद येंडे, महेश साटेलकर, नरेश गावडे, महेश पणशीकर, शिवदास गावडे, संदीप वेरेकर, राजू नाईक, चंद्रशेखर खडपकर, अनिल नाईक, सुभाष पारकर आणि राघोबा गावडे निवडणूक रिंगणात आहेत.

आणखी वाचा:

गोवा: गोमॅकोतील कर्मचारी रंगनाथ भोजे ठरले पहिले कोरोना लस लाभार्थी - 

संबंधित बातम्या