Goa Panchayat Election: पेडण्‍यात पावसाची पर्वा न करता बजावला मतदानाचा हक्क!

या निवडणुकीत 36 माजी सरपंच तर 26 पंचसदस्‍य रिंगणात होते.
Vote
Vote Dainik Gomantak

पेडणे: पेडणे तालुक्यातील एकूण 17 ग्रामपंचायतींसाठी शांततेत मतदान पार पडले. सकाळपासून मतदानकेंद्रांवर मतदारांच्या रांगा दिसून येत होत्या. पावसाची पर्वा न करता मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. पेडणे तालुक्यातील मोरजी, आगरवाडा, मांद्रे, पार्से, पालये, केरी, कोरगाव, हरमल, वझरी, तोरसे, तांबोसे, विर्नोडा, तुये, वारखंड, हणखणे, धारगळ, न्हयबाग-पोरसकडे या 17 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये उत्साह दिसून आला. एकूण 450 उमेदवारांचे भवितव्य 127 प्रभागांमधून सीलबंद झाले. त्यात 230 महिला उमेदवारांचा समावेश आहे.

(Voting rights exercised irrespective of rainfall in pernem)

Vote
‘झुआरी’ची पुनरावृत्ती घडू नये!

या निवडणुकीत 36 माजी सरपंच तर 26 पंचसदस्‍य रिंगणात होते. यापूर्वी एकूण चार पंचसदस्य बिनविरोध निवडून आलेले आहेत. त्यात तोरसे येथील प्रार्थना मोटे, इब्रामपूर येथील दीक्षा हळदणकर, आगरवाडा हेमंत चोपडेकर आणि हरमल येथील बेर्नाड फर्नांडिस यांचा समावेश आहे. दरम्‍यान, या निवडणुकीसाठी सुमारे एक हजार कर्मचारी गुंतले होते. कुठेही अनुचित प्रकार घडला नाही.

89 टक्के मतदान

पेडणे तालुक्यातील एकूण 17 ग्रामपंचायतींसाठी सरसरी 89 टक्के मतदान झाले. सकाळी 8 वाजता मतदान प्रक्रिया सुरू झाली ती दुपारपर्यंत तसा थंडाच प्रतिसाद होता. मात्र संध्‍याकाळी मतदार मोठ्या संख्‍येने घराबाहेर पडले. त्‍यामुळे मतदान 89 टक्क्‍यांवर पोचले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com