प्रियोळमधील प्राबल्य कमी झाल्याने व्हीपीके वेठीस’

dainik Gomantak
मंगळवार, 30 जून 2020

प्रियोळ मतदारसंघात प्राबल्य कमी होत असल्याची जाणीव झाल्याने सहकारमंत्री गोविंद गावडे यांनी व्हीपीके अर्बन को-ऑपरेटीव्ह सोसायटी वेठीस धरली असल्याची टीका माजी सहकारमंत्री दीपक ढवळीकर यांनी केली आहे.

पणजी
सहकारमंत्री दीपक ढवळीकर यांनी ‘गोमन्तक’च्या व्हिडोओ बुलेटिनला दिलेल्या मुलाखतीत मंत्री गावडे यांनी व्हीपीके अर्बन बँकेची कर्ज मर्यादा वाढ ही ढवळीकर यांनी आपल्या फायद्यासाठी करून घेतल्याचा आरोप केला होता. त्यानंतर काही तासांत ढवळीकर यांनी ‘गोमन्तक’शी संपर्क साधून आपली भूमिका मांडली. ढवळीकर म्हणाले की, व्हीपीके अर्बन को-ऑपरेटीव्ह सोसायटीकडून ढवळीकर म्हणजेच माझ्या कुटुंबाने जे कर्ज घेतले आहे, त्याचे हप्ते फेडले जात आहेत. आम्ही कर्ज घेताना कोणताही गैरप्रकार केलेला नाही. जे सुमारे दीड कोटी रुपयांचे कर्ज घेतले आहे, ते फेडण्यासाठी आम्ही समर्थ आहोत. शिवाय तीनपट रकमेची मालमत्ता आम्ही बँकेला तारण दाखविली आहे.
मंत्री गावडे जे आमच्या कुटुंबावर आरोप करीत आहेत, ते सर्व बिनबुडाचे आहेत. त्यात कोणतेही तथ्य नाही, आरोप करून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रकार सध्या सुरू आहे. प्रियोळ मतदारसंघात त्यांचे पूर्वी असलेले प्राबल्य कमी झाले आहे, त्यातून त्यांची मानसिकता ढळली असल्यानेच बेजाबाबदार वक्तव्य करीत आहेत. जे दीड कोटी रुपयांचे कर्ज घेतले आहे, ते फेडले जात आहे आणि त्यामुळे जर सोसायटीवर आर्थिक निर्बंध येऊ शकतात, असे त्यांना वाटत असेल तर त्यांचा सहकारातील अभ्यास कमी असावा असे वाटते, असाही प्रतीटोला ढवळीकर यांनी लगवला आहे.
 

संबंधित बातम्या