‘व्हीपीके’ कृषी खरेदी विक्री सोसायटीचे कार्य वाढवणार

प्रतिनिधी
गुरुवार, 10 सप्टेंबर 2020

पांडुरंग गावडे ः पाच वर्षांसाठी नवीन समितीची निवड

फोंडा: ‘व्हीपीके कृषी खरेदी विक्री प्रक्रिया संस्था मर्यादित’ची भरभराट ही संस्थेच्या भागधारक व शेतकऱ्यांमुळे भरभराटीस आली आहे. या संस्थेत प्रत्येकजण हिरीरीने भाग घेऊन प्रामाणिकपणे काम करतो. त्यामुळे या संस्थेचा लौकीक दिवसेंदिवस वाढत आहे. संस्थेची ही घौडदोड कायम राहावी, यासाठी ‘व्हीपीके’ कृषी खरेदी विक्री प्रक्रिया संस्थेचे कार्य वाढवणार आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग शंकर गावडे यांनी दिली. 

म्हार्दोळ येथील संस्थेच्या कार्यालयात ‘व्हीपीके’ कृषी खरेदी विक्री प्रक्रिया संस्था, मर्यादित या संस्थेची पाच वर्षांसाठी निवडणूक घेण्यात आली. या संस्थेवर चेअरमन म्हणून पांडुरंग गावडे, हिरू शानू खेडेकर (उपाध्यक्ष), अशोक दत्ता गावडे (सचिव), तुळशीदास नागू गावडे (सहसचिव) यांची संचालक मंडळावर बिनविरोध निवड झाली. २०२० ते २०२५ या कार्यकाळासाठी कार्यकारिणीची निवड करण्यात आली असून, निवडण्यात आलेले अन्य पदाधिकारी पुढीलप्रमाणे ः रोहिदास अंतुलो गावडे, सूर्या सदाशिव गावडे, संतोष सोनू केसकर, शशिकांत रामू बोरकर, नीलेश रोहिदास गावडे, रामदास राघोबा वेलिंगकर, दीपक नारायण गावडे, चंद्रकांत बाबयी गावडे, रती ऊर्फ चंद्रा रामा गावडे, रोशन चंद्रकांत गावडे यांची निवड झाली.

‘व्हीपीके कृषी खरेदी विक्री प्रक्रिया संस्था मर्यादित’ या संस्थेची ५ नोव्हेंबर २००४ मध्ये स्थापना झाल्यानंतर संस्थेने आपले हातपाय पसरण्यास सुरवात केली. सध्या संस्थेच्या तीन शाखा कार्यरत आहेत. या संस्थेत सध्या २८१३ भागधारक असून, संस्थेचे ३० लाख ५० हजार रुपये भागभांडवल आहे. या संस्थेत ५०च्या वर कर्मचारी कार्यरत आहेत.

संबंधित बातम्या