Goa Jal Jeevan Mission: पैसे भरून झाले, आता नळ जोडणीची प्रतीक्षा

Canacona: केंद्र सरकारची ‘हर घर नल जल’ योजना काणकोणात फसल्याचे समोर येत आहे
 Jal Jeevan Mission
Jal Jeevan MissionDainik Gomantak

Canacona: केंद्र सरकारची ‘हर घर नल जल’ योजना काणकोणात फसल्याचे समोर येत आहे. आजही काही वाड्यावर नळाद्वारे पाणी पोचले नाही. काही ठिकाणी नळ आहे, पण नळात पाणी नाही, परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्य सरकारने या योजनेखाली शंभर टक्के रहिवाशांना पाण्याची जोडणी देण्यात आली, अशी घोषणा केली. मात्र प्रत्‍यक्षात स्‍थिती निराळी दिसत आहे.

 Jal Jeevan Mission
Goa Accident : गोव्यात 12 तासात 2 भीषण अपघात

* असे आहे वास्‍तव

1. लोलये येथील माड्डीतळप येथील तीन धनगर कुटुंबीयांना या योजने अंतर्गत नळ जोडणी देण्यासाठी मीटरसाठी ‘डीडी’ काढून पैसे भरण्यास जलपुरवठा खात्याच्या अभियंत्यांनी सांगितले. पैसे भरल्यानंतर अभियंत्यांनी मीटर आणून बसविले. मात्र काही दिवसातच हे बसविलेले मीटर कोणतेच कारण न देता काढून नेण्यात आले, अशी कैफियत माड्डीतळप येथील खरात कुटुंबाच्या महिला मांडत आहेत.

2. ग्रामस्थांच्या समस्येची दखल घेऊन सभापती रमेश तवडकर यांनी जलपुरवठा खात्याच्या अभियंत्यांना माड्डीतळप येथे बोलावून त्यांचे म्हणणे ऐकून घेऊन त्यांना नळ जोडणी देण्याचे निर्देश दिले.

3. काणकोण (Canacona) तालुक्यातील वेगवेगळ्या भागात अद्याप पैसे भरूनही नळ जोडणी देण्यात आली नाही, मात्र त्याची ठोस कारणे जलपुरवठा खात्याच्या अभियंत्याकडून देण्यात येत नाहीत. लोलये पंचायत क्षेत्रातील दापट ते पोळेपर्यंत प्रत्येक वर्षी जानेवारी महिन्यापासून टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो. त्याशिवाय माड्डीतळप येथे एका खासगी विहिरीतून जलवाहिनी घालून या भागातील अल्प दरात पाणीपुरवठा करण्यात येतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com