वाळपई पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी

dainik gomantak
मंगळवार, 19 मे 2020

वाळपई शहरी भागात तसेच पणजी मार्ग, होंडा याभागात वाहनांद्वारे जनजागृती केली आहे.

वाळपई, 

वाळपई पोलिसांनी २२ मार्च पासून आतापर्यंत टाळेबंदीत उल्लेखनीय अशी कामगिरी केली आहे. त्याचा फायदा जनतेला झाला असून कोरोना सारख्या रोगा विरोधात लढण्यास लोकांनाही बळ मिळाले आहे.
वाळपई शहरी भागात तसेच पणजी मार्ग, होंडा याभागात वाहनांद्वारे जनजागृती केली आहे. केरी येथे तपासणी नाक्यावर सतत चोवीस तास पोलिसांनी पाळत ठेवली आहे. त्यामुळे वाळपई पोलिसांनी बरीच मेहनत मागील अडीच महिन्यात घेतलेली आहे. त्या कार्याचे सर्वजण कौतुक करीत आहेत. वाळपई काँग्रेस गट समितीने आज सोमवारी वाळपईचे पोलीस निरीक्षक शिवराम वायंगणकर यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. वाळपई पोलिसांनी दाखविलेली कर्तबगारी यामुळे समाजातील लोकांनी पोलिसाना धन्यवाद दिले आहेत. वाळपई शहरी भागात तसेच पणजी मार्ग, होंडा याभागात वाहनांद्वारे जनजागृती केली आहे.

संबंधित बातम्या