शिरोडा बोरी रस्त्यावरील गतीरोधकांवर रंगीत पट्टे मारावेत

daily gomantak
शुक्रवार, 29 मे 2020
विद्यालयाकडे जाणाऱ्या हमरस्त्यावर दोन मोठे गतीरोधक आहेत. या गतीरोधकावरील पांढऱ्या रंगाचे पट्टे धुपून गेल्याने वेगाने येणाऱ्या वाहनाना हे गतीरोधक समजत नाही

बोरी-, शिरोडा तसेच बोरी मांगीरवाडा पेडाकडे येथील प्रमुख रहदारीच्या रस्त्यावरील गतीरोधकावर रंगीत पट्टे मारावेत अशी वाहनचालक आणि रहिवाशांची मागणी आहे.
शिरोडा पंचायत क्षेत्रातील वाजे येथील भारतीय संस्कृती
प्रबोधिनीच्या गोमंतक आयूर्वेद महाविद्यालयासमोरील रस्त्यावर दोन ठिकाणी मोठे गतीरोधक बसवण्यात आले आहेत. तसेच मांगीरवाडा बोरीच्या हमरस्त्यावरही मोठाला गतीरोधक आहे. तसेच पेडाकडे या ठिकाणी
येथील प्रगती विद्यालयाकडे जाणाऱ्या हमरस्त्यावर दोन मोठे गतीरोधक आहेत. या गतीरोधकावरील पांढऱ्या रंगाचे पट्टे धुपून गेल्याने वेगाने येणाऱ्या वाहनाना हे गतीरोधक समजत नाही. व वाहनांची चाके जोरात आढळल्याने वाहनाना मोठे हादरे बसतात. तसेच दुचाकी
वाहनचालकांना याचा त्रास होतो. वाजे शिरोड्याच्या गतीरोधकावर तसेच मांगीरवाडा पेडाकडील गतीरोधकावर
अनेक दुचाकी वाहनाना अपघात घडून वाहनचालक आणि मागे बसलेल्याना गंभीर स्वरूपाच्या जखमा घेतल्या आहेत. तसेच हातापायाना दुुखापती झालेल्या आहेत. काही जणांचे हातपाय फॅक्‍चर होण्याचे प्रकार घडले आहेत. बोरीच्या हमरस्त्याने रात्रीच्या वेळी परराज्यातून मालवाहू अवजड वाहने मोठ्या प्रमाणावर वेगाने जातात. त्यांना हे गतीरोधक समजत नसल्याने वाहनाना गंभीर स्वरूपाचे अपघात घडून प्राणहानी तसेच
वित्तहानी होण्याची शक्‍यता आहे. संबंधित खात्याने रंग गेलेल्या या गतीरोधकावर पांढऱ्या रंगाचे पट्टे देऊन रंग द्यावा. व घडणारे अपघात टाळावेत. अशी वाहनचालक आणि रहिवाशांची मागणी आहे.

संबंधित बातम्या