पणजी नगरपालिका निवडणुकीसाठी प्रभागनिहाय आरक्षण जाहीर

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 9 फेब्रुवारी 2021

गोवा राज्य निवडणूक आयोगाने (एसईसी) पणजी शहर महानगरपालिका (सीसीपी) प्रभागांच्या आरक्षणाला अधिसूचित केले असून त्यातील काही प्रभागांचे विभाजन करून प्रभाग क्रमांक बदलण्यात आले आहेत.

पणजी : गोवा राज्य निवडणूक आयोगाने (एसईसी) पणजी शहर महानगरपालिका (सीसीपी) प्रभागांच्या आरक्षणाला अधिसूचित केले असून त्यातील काही प्रभागांचे विभाजन करून प्रभाग क्रमांक बदलण्यात आले आहेत. एसईसी आयुक्त चोखा राम गर्ग यांनी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार एकूण 14 प्रभाग सर्वसाधारण प्रवर्गासाठी, 5 इतर मागासवर्गीय , महिलांसाठी 7, ओबीसी महिलांसाठी 3 आणि अनुसूचित जातींसाठी 1 अशाप्रकारे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. पणजीसह 11 नगरपालिकांच्या निवडणुका पार पडणार आहेत.

गोव्यातील बारा आमदार अपात्रता प्रकरणी उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित असलेले प्रभाग क्रमांक :

प्रभाग क्रमांक 1, 3, 6,8,10,11,13,14,17,22,23,26,28 आणि 29.

महिलांसाठी आरक्षित प्रभाग क्रमांक :

4,5,9,15,21,27 आणि 30

ओबीसीं महिलांसाठी आरक्षित प्रभाग क्रमांक :

12, 18 आणि 24. 

ओबीसीं पुरूषांसठी आरक्षित प्रभाग क्रमांक :

7, 16,19,20,25 आणि

एसटी प्रवर्गासाठी आरक्षित प्रभाग क्रमांक :

2

गोव्यात वेश्याव्यवसाय रॅकेटचा पर्दाफाश; दोघांना अटक

नगरसेवक सुरेंद्र फुर्ताडो यांचा प्रभाग क्रमांक ओबीसींसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. तसेच माजी उपमहापौर लता पारेख यांचा प्रभाग ओबीसी महिलांसाठी राखीव आहे. पणजी महापौर उदय मडकईकर यांचा प्रभाग क्रमांक 18 वरून 14 करण्यात आला असून, सर्वसाधारण खुल्या गटाच्या उमेदवारासाठी राखीव ठेवण्यात आला आहे. भाजपा नगरसेवक प्रमय मैनकरांचा प्रभाग क्रमांक 16 वरून 7 करण्यात आला असून ओबीसी महिलांसाठी राखीव आहे.रुथ फुर्टाडो प्रभाग क्रमांक 10 वरून 9 पर्यंत बदलला आहे आणि तो महिलांसाठी आरक्षित आहे. भाजपाचा पुंडलिक राऊत देसाई प्रभाग क्रमांक 21 वरून 15 व तो महिला उमेदवारासाठी राखीव आहे. इतर प्रभागांचे आरक्षण पूर्वीसारखेच राहिले आहे. दरम्यान, नवीन सीमांकना अंतर्गत आधी केवळ दोन सीसीपी वॉर्ड असलेल्या रिबंदर भागात अजून एक वॉर्ड मंजूर झाला आहे.

गोव्यातील 11 पालिकांच्या निवडणुकीसाठी नगरविकास खात्याने आरक्षणाचा आदेश काढला आहे. त्यामध्ये महिला, अनुसूचित जाती व जमाती तसेच इतर मागासवर्गीयांसाठी प्रभाग आरक्षण निश्‍चित करण्यात आले आहे. या ११ पालिकांमध्ये मडगाव, मुरगाव, म्हापसा, कुडचडे काकोडा, केपे, कुंकळ्ळी, काणकोण, पेडणे, डिचोली, सांगे, वाळपई यांचा समावेश आहे. ही निवडणूक मार्चमध्ये होणार असली तरी येत्या काही दिवसांत गोवा राज्य निवडणूक आयोग निवडणुकीची तारीख जाहीर करण्याची शक्यता आहे. साखळी व फोंडा पालिका तसेच पणजी महापालिकेची मुदत संपलेली नाही त्यामुळे या निवडणुका या ११ पालिकांबरोबर न घेता पंचायत व जिल्हा पंचायत पोटनिवडणुकीबरोबर होण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या