सासमोळे येथे महिलांकडून जंगी स्वागत; प्रतिसाद वाढला

या उत्सवाला महिलांचा दिवसेंदिवस प्रतिसाद वाढत आहे.
सासमोळे येथे महिलांकडून जंगी स्वागत; प्रतिसाद वाढला
सासमोळे येथे महिलांकडून जंगी स्वागत; प्रतिसाद वाढलाDainik Gomantak

मडगाव: मुरगाव, दाबोळी, कुठ्ठाळी या तीन मतदारसंघातील ‘जनमन उत्सव’ सर्वेक्षण पूर्ण झाल्यावर आजपासून वास्को मतदारसंघात हे सर्वेक्षण सुरू झाले असून, आज सासमोळे येथील महिलांनी या उपक्रमाचे जंगी स्वागत केले. या उत्सवाला महिलांचा दिवसेंदिवस प्रतिसाद वाढत आहे.

सासमोळे येथे सर्व थरातील महिला या सर्वेक्षनात उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्या. त्यात येथील अंगणवाडीच्या सहाय्यक महिलेचाही समावेश होता. युवा गृहिणीही या उपक्रमात सहभागी झाल्या. या उपक्रमाद्वारे गोमंतक महिलांची मते जाणून घेत असून त्यांना अपेक्षित असलेला गोवा कसा साकारता येऊ शकेल याची भविष्यात योजना बनविली जाणार आहे. गोव्यातील एकूण ३ लाख महिलांची मते आजमावून हा आराखडा तयार केला जाणार आहे.

सासमोळे येथे महिलांकडून जंगी स्वागत; प्रतिसाद वाढला
मडगावात 1 लाख 46 हजारांचे अंमली पदार्थ जप्त

दरम्यान, कुंकळ्ळी मतदारसंघात हे सर्वेक्षण सुरू असून, आज देमानी येथील महिलांनी त्यात भाग घेतला. सासष्टीत आतापर्यंत मडगाव, फातोर्डा, कुडतरी आणि नावेली या चार मतदारसंघात हे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com