उच्च न्यायालयाकडून जिल्हाधिकाऱ्यांची कान उघडणी 

दैनिक गोमंतक
मंगळवार, 11 मे 2021

मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने गोव्यात प्रवेश करणाऱ्यांना करण्याचा अंतरिम आदेश असताना गोमंतकियाना प्रवेश करण्यास तसेच गोव्यात कामानिमित्त येणाऱ्यांना सूट दिल्याप्रकरणी उत्तर व दक्षिण  जिल्हाधिकाऱ्यांची कानउघाडणी केली

पणजी : मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने गोव्यात प्रवेश करणाऱ्यांना करण्याचा अंतरिम आदेश असताना गोमंतकियाना प्रवेश करण्यास तसेच गोव्यात कामानिमित्त येणाऱ्यांना सूट दिल्याप्रकरणी उत्तर व दक्षिण  जिल्हाधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. खंडपीठाने दिलेल्या आदेशापेक्षा जिल्हाधिकारी श्रेष्ठ आहे का? असा प्रश्न करत धारेवर धरले. आज संध्याकाळपर्यंत त्यात दुरुस्ती करावी अन्यथा मुख्य सचिवांना जबाबदार धरण्याचा इशारा गोवा खंडपीठाने दिला आहे.  (Warning to the Collector from the High Court) 

मागील 10 दिवसात गोव्यात झपाट्याने वाढतीये अ‍ॅक्टिव रुग्णसंख्या

कोविड इस्पितळात प्राणवायूचा पुरेसा पुरवठा आहे का यासंदर्भात सविस्तर माहिती देणारे प्रतिज्ञापत्र उद्यापर्यंत (१२ मे) सादर करणाचे आज निर्देश दिले. राज्यात कोविड चाचणी अहवाल येण्यास उशीर का होतो याची कारणे काय अशी विचारणा केली आहे. दरम्यान राज्यात  येणाऱ्या पर्यटकांसाठी कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट किंवा लसीकरण पुरावा सक्तीचा केलं आहे. मात्र राज्यात महाराष्ट्राच्या सिमभागातून नोकरीनिमित्त दररोज ये-जा करणाऱ्या यातून सूट दिल्यामुळे उच्च न्यायालयाने जाब विचारला आहे. 

संबंधित बातम्या