राज्यात पुढील 4 दिवस अतिवृष्टीचा इशारा

आज राज्यात ऑरेंज अलर्ट जारी केला असून पावसासह सुमारे 40 कि. मी. ताशी वेगाने वारे वाहण्याची शक्यता हवामान खात्याच्या वेधशाळेने वर्तविली आहे.
राज्यात पुढील 4 दिवस अतिवृष्टीचा इशारा
Goa Weather UpdateDainik Gomantak

पणजी: राज्यात आजपासून पुढील चार दिवस 24 जूनपर्यंत राज्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता आहे. आज राज्यात ऑरेंज अलर्ट जारी केला असून पावसासह सुमारे 40 कि. मी. ताशी वेगाने वारे वाहण्याची शक्यता हवामान खात्याच्या वेधशाळेने वर्तविली आहे.

(Warning of heavy rains in the next 4 days in Goa)

Goa Weather Update
मुलीचे अपहरण केल्‍याप्रकरणी नेपाळच्या युवकाला अटक

राज्यात 22, 23 जूनला पावासाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. सर्वसामान्य पावसाच्या तुलनेत यंदाच्या जूनमध्ये 47 टक्के पावसात घट झाली असून गेल्या वर्षी 20 जूनपर्यंत सरासरी पावसापेक्षा 39 टक्के अधिक पाऊस पडला होता. यंदा जूनमध्ये सरासरी पावसापेक्षा कमी पाऊस बरसण्याची शक्यता यापूर्वीच हवामान खात्याद्वारे वर्तविण्यात आली होती. आज पणजी येथे कमाल 29.8 अंश सेल्सिअस, तर किमान 23.7 अंश सेल्सिअस पावसाची नोंद झाली, तर पेडणे आणि काणकोण येथे सर्वाधिक 2 सें.मी. पावसाची नोंद झाल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com