कचरा व्यवस्थापनमंत्री मायकेल लोबो हे मंत्रीपदासाठी अपात्र- लोकायुक्त मिश्रा

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 4 ऑक्टोबर 2020

उत्तर गोवा नियोजन व विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष असताना त्यांनी सूडबुद्धीने केलेल्या कारवायांबद्दलही न्यायमूर्ती पी. के. मिश्रा यांनी त्यांना फटकारले आहे.  

पणजी- कचरा व्यवस्थापनमंत्री मायकेल लोबो हे मंत्रीपदासाठी अपात्र आहेत, अशी टीका राज्य सरकारला केलेल्या निवेदनात गोव्याचे लोकायुक्त न्यायमूर्ती पी. के. मिश्रा यांनी केली आहे. उत्तर गोवा नियोजन व विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष असताना त्यांनी सूडबुद्धीने केलेल्या कारवायांबद्दलही न्यायमूर्ती पी. के. मिश्रा यांनी त्यांना फटकारले आहे.  

अर्पोरा-नागोआ ग्रामपंचायतीच्या इतर अधिकाऱ्यांवरही लोकायुक्तांनी यावेळी टीका केली. अरपोऱ्याचे रहिवासी गुलाब डि सुझा यांना बांधकाम परवानगी परवाना देण्यास मुद्दाम उशीर करून त्यांचे नुकसान केल्याचाही ठपका लोकायुक्त मिश्रा यांनी ठेवला आहे. लोबो यांना कोणत्याही प्रकरणात नाक घालून चुका दर्शवण्याचे अधिकार नाहीत. जर असा प्रश्न उद्भवला असेल तर तो सोडवण्यासाठी दिवाणी न्यायालय सक्षम आहे किंवा मान्यताप्राप्त सरकारी नोंदी देऊन खटले निर्णयी निघू शकतात, असेही यावेळी लोकायुक्त म्हणाले.
 

संबंधित बातम्या