तीस तासांच्या प्रतीक्षेनंतर अखेर डिचोलीत नळांना पाणी 

WATER TAP.jpg
WATER TAP.jpg

डिचोली: जवळपास तीस तासांच्या प्रतीक्षेनंतर अखेर डिचोली (Bicholim) तालुक्यात नळांना पूर्ववत पाणी (Water) आले. पडोसे जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या  (Water purification project) 33 केव्ही भूमिगत वीजवाहिनीत निर्माण झालेला बिघाड अखेर दूर करण्यात काल रात्री साधारण दहा वाजण्याच्या सुमारास यश आले. (Water came to the taps in Bicholim After waiting for thirty hours )

मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास नळांतून पाणी गळू लागले. रविवारी तर नळांतून पाणी घसघसून येत होते. पडोसे जलशुद्धीकरण प्रकल्पातून डिचोली तालुक्यासह सत्तरी आणि तिसवाडी तालुक्यातील चोडण भागाला पाणी पुरवठा होत आहे. या प्रकल्पात तांत्रिक बिघाड निर्माण झाला की डिचोलीसह अन्य भागात पिण्याच्या पाण्यासाठी मारामारी होते.

नळ कोरडे राहिल्याने भर पावसाळ्यात पाण्याअभावी डिचोली तालुक्यातील जनतेचे विशेष करून गृहिणींचे  हाल झाले. डिचोली तालुक्याला पाणी पुरवठा करणाऱ्या पडोसे जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या 33 केव्ही भूमिगत वीजवाहिनीत बिघाड झाल्याने ही समस्या निर्माण झाली होती. दरम्यान, भूमिगत वीजवाहिनीतील बिघाड दूर करण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेताना रात्री उशिरा बिघाड दूर करण्यात वीज खात्याच्या कर्मचाऱ्यांना यश आल्याची माहिती मिळाली होती. मात्र पंपिंग आदी प्रक्रियेमुळे रविवारी पहाटेपर्यंत पाणी पुरवठा सुरळीत होईल असे संकेत सूत्रांकडून मिळाले होते. (Goa) 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com