जलवाहिनी पुन्हा फुटली! जेसीबीचा वाहिनीला धक्का

गिरी सर्विस रोडवर प्रकार
Waterline Burst in Mapusa
Waterline Burst in MapusaDainik Gomantak

म्हापसा : गिरी-म्हापसा येथील सर्व्हिस रस्त्यावरील भूमिगत जलवाहिनी रविवारी (ता. 24) रस्ता विभागाच्या आततायीपणामुळे पुन्हा एकदा फुटली. शनिवारी सकाळी हीच जलवाहिनी अचानकपणे फुटली होती.

त्यानंतर, सदर जलवाहिनी दुरुस्त करण्यात आलेली व मातीचा भराव टाकून रस्त्यावर पडलेला खड्डा बुजवून सपाटीकरण करताना या जलवाहिनीला धक्का बसल्याने ती फुटली असावी,असा संशय आहे.

(Waterline Burst in Mapusa)

Waterline Burst in Mapusa
Panchayat Election: सभापती रमेश तवडकर यांच्या पत्नी सविता तवडकर यांचा उमेदवारी अर्ज

प्राप्त माहितीनुसार, शनिवारी गिरी-म्हापसा येथील भूमिगत जलवाहिनी पाण्याच्या दबावामुळे फुटली होती व त्यामुळे सदर रस्ता खचल्याने त्याठिकाणी मोठे भगदाड पडले होते. कालांतराने सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पाणीपुरवठा विभागाने ही वाहिनी दुरुस्ती करण्याचे काम हाती घेतले. हे काम शनिवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास पूर्ण झाले.

त्यानंतर, रविवारी (ता.24) दुपारी रस्ता विभागाकडून याठिकाणी मातीचा भराव टाकून हे भगदाड बुजविले जात होते. त्यावेळी रोलर फिरवताना या पाईपलाइनला धक्का पोहचल्याने कदाचित ही जुनी 500 एमएलडी वाहिनी पुन्हा फुटल्याचा संशय साबांखा पाणीपुरवठ्याच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com