काणकोणमधील पाळोळे समुद्रकिनार्‍यावर पाण्याने भरती रेषा ओलांडली; पाणी पातळीत अचानक वाढ

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 16 फेब्रुवारी 2021

दक्षिण गोव्यातील पाळोळे या जगप्रसिद्ध समुद्रकिनार्‍यावर आज पहाटे चार वाजण्याच्या दरम्यान समुद्राच्या पाण्याची पातळी अचानक पणे वाढली.

पणजी : दक्षिण गोव्यातील पाळोळे या जगप्रसिद्ध समुद्रकिनार्‍यावर आज पहाटे चार वाजण्याच्या दरम्यान समुद्राच्या पाण्याची पातळी अचानक पणे वाढली. समुद्राचे पाणी भरती रेषा ओलांडून तेथून 300 मीटरवर असलेल्या रस्त्याला लागले होते. पहाटे किनाऱ्यावर चालण्यास जाणाऱ्यांच्या ही बाब लक्षात आली मात्र यामागचे कारण समजून आले नाही. पाळोळे हा समुद्रकिनारा दक्षिण गोव्यातील काणकोण तालुक्यात आहे आणि तो जगप्रसिद्ध आहे.

गोव्यात 17 तारखेपासून जोरदार पावसाची शक्यता; हवामान विभागाचा इशारा

या किनार्‍यालगतहून रस्ता जातो एरवी या रस्त्यापासून सुमारे तीनशे मीटर वर भरतीचे पाणी येऊन थांबते, मात्र आज पहाटे समुद्र बराच पुढे आलेला या लवकरच दिसून आला. या मागचे कारण आत्ताच समजू शकलेले नाही मात्र यापूर्वी असा प्रकार अनेकदा घडला होता असे स्थानिकांचे म्हणणे आहे. दक्षिण गोव्यातील इतर काही किनाऱ्यांवर असे समुद्राचे पाणी पुढे आल्याचे वृत्त मात्र नाही. भरती रेषेला ओलांडून समुद्र पुढे आला असला तरी यातून कोणतीही वित्तहानी झालेली नाही.

गोव्यातील हॉटेल व्यवसायाकडे भारतीय पर्यटकांची पाठ

संबंधित बातम्या