गोव्यात सलग सहा दिवस पाणीपुरवठा बंद

गोव्यात सलग सहा दिवस पाणीपुरवठा बंद
water tap

पेडणे ः पेडणे तालुक्यात सलग सहा दिवस पाणीपुरवठा बंद असल्याच्या पाश्वर्भूमीवर झाल्याने पेडणे मगो नेते प्रवीण आर्लेकर यांनी आपल्या कार्यकर्त्या समवेत  चांदेल प्रकल्पाची पाहणी केली व लवकरात लवकर पाणी सुरळीत करावे, अन्यथा चांदेल पाणी प्रकल्पाच्या बाहेर आंदोलन करणार येईल, असा इशारा प्रकल्प अधिकारी बालाजी फडते यांना दिला. म.गो. नेते प्रवीण आर्लेकर यांनी आज सकाळी चांदेल येथील पाणी प्रकल्पात भेट देऊन पेडणे तालुक्यातील पाणी टंचाई बाबत प्रकल्प अधिकारी बालाजी फडते यांच्याशी चर्चा केली. सद्यस्थितीत 10  एम एल डी एवढे पाणी शुद्ध होऊन पुरवठा केला जातो. येत्या दोन चार दिवसांत संपूर्ण पेडणे तालुक्यात पुरवठा होईल,असे फडते यांनी सांगितले.  (Water cut in Goa for six days)

पेडणे तालुक्यातील अनेक गावात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाल्याने प्रवीण आर्लेकर यांनी तालुक्यातील काही ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा करून लोकांची गरज भागवली आहे. आज सकाळी चांदेल येथून पाणीपुरवठा का होत नाही,हे जाणून घेण्यासाठी मगोचे नेते प्रवीण आर्लेकर आणि उमेश तळवणेकर यांनी  चांदेल पाणी प्रकल्पाला  भेट देवुन प्रकल्पाधिकारी बालाजी फडते यांच्याशी चर्चा केली. पेडणे तालुक्यात पाण्याची तीव्र टंचाई भासत असताना स्थानिक आमदार उपमुख्यमंत्री बाबु आजगावकर यांनी विशेष लक्ष घालून पाणी टंचाई दुर करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक होते  मात्र आजगावकर यांनी लोकांना वार्यावर सोडले. याबाबत प्रवीण आर्लेकर आणि उमेश तळवणेकर यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. 

फडते यांच्याकडे प्रावीण आर्लेकर व उमेश तळवणेकर यांच्याकडे विचारणा केली असता गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात पाणीपुरवठा करणारे पाण्याचे पंप बिघडले होते. पंप नादुरुस्त झाल्याने व  वीजपुरवठा खंडित झाल्याने पाणी पुरवठा बंद झाला होता. आता  पंपाची दुरुस्ती झाली आहे. तसेच कालपासून नळाला पाणीपुरवठा सुरू केला आहे. मात्र सुरळीतपणे पाणीपुरवठा होण्यास अजून दोन चार दिवस लागतील, असे फडते यांनी सांगितले. सद्यस्थितीत चांदेल पाणी प्रकल्पातील नादुरुस्त पंप दुरुस्ती झाले असून गावागावात टाकी भरून नळाला पाणी पुरवठा होण्यासाठी अजून दोन चार दिवस लागणार आहे. त्यानंतर सुरळीतपणे पाणीपुरवठा होईल, असे फडते यांनी यावेळी स्पष्ट केले. मात्र त्यानंतर देखील योग्य प्रमाणात पाणीपुरवठा झाला नाही, तर  पेडणे मतदारसंघातील लोकांना सोबत घेऊन पाणी विभागाच्या कार्यालयावर भव्य मोर्चा काढून अधिकाऱ्याना  जाब विचारला जाणार आहे, असा इशारा प्रवीण आर्लेकर आणि उमेश तळावणेकर यांनी यावेळी दिला.

काही भागांत टॅंकरद्वारे पाणीपुरवठा, विहिरी, तळ्यांचा सहारा

वादळामुळे पेडणे तालुक्यातील  वीजपुरवठा खंडित झाला, तसेच  पाण्यासाठी लोकांचे सुरू झाले. वीज खांब व वीज वाहिन्यांवर झाडे, माड पडल्याने खांब मोडले, वीज वाहिन्या तुटल्या. झाडे कापून टाकण्याचे काम अग्निशामक दलाचे जवान दिवसभर करत होते. पण मानव बळ अपुरे पडत असल्याने त्यावर मर्यादा येत होत्या. वीज कर्मचाऱ्यांच्या बाबतीत ही तेच. त्यातही वीज खांब वगेरे सामानाचा तुटवडा. यामुळे  तीन दिवस वीजपुरवठा बंद होता.  त्यानंतर काही ठिकाणी वीज पुरवठा सुरु झाला. तालुक्यात सुमारे 20 टक्के ठिकाणी वीजपुरवठा झालेला नाही. वीजपुरवठा सुरू झाला असला तरी वीजेचा लपंडाव हा सुरुच असतो. त्याचा परिणाम पाणीपुरवठ्यावर झालेला आहे. तालुक्याला पाणीपुरवठा करणारा चांदेल जलप्रकल्प सुरळीत वीज पुरवठ्या अभावी बंद झाल्याने परिणामी वीजे अभावी प्रकल्प सुरू राहू शकत नाही. संपूर्ण पेडणे तालुक्याला होणारा पाणीपुरवठा वादळ झाल्यापासून (18  मे )पासून आतापर्यंत  बंद आहे. पाणीपुरवठा कार्यालयाचे टॅंकरही बंद आहेत. यामुळे काही सामाजिक संस्था, राजकारणी आदींनी टॅंकरद्वारे विविध गावात पाणीपुरवठा करत आहेत, तर काही लोक विहिरी, तळे, झरी येथून पाणी आणत आहेत.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com