Waste of water: जलवाहिनी फुटून पाण्याची नासाडी

मोबाईल टॉवरसाठी भूमिगत केबलचे काम सुरू असताना जलवाहिनी फुटून लाखो लिटर्स पाण्याची नासाडी झाली
Waste of water
Waste of waterDainik Gomantak

रिलायन्स कंपनीच्या जिओ मोबाईल टॉवरसाठी भूमिगत केबलचे काम सुरू असताना खैरिखाटे येथील मुख्य रस्त्यावर पाणीपुरवठा खात्याच्या 110 व्यासाची जलवाहिनी फुटून लाखो लिटर्स पाण्याची नासाडी झाली. जलवाहिनी फुटण्याची ही तिसरी वेळ असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला.

Waste of water
No Parking Zone: अवैधरित्या पार्किंगवर कारवाईची मागणी

काम करताना आवश्यक ती सावधगिरी न पाळता काम केल्यामुळे असे प्रकार वारंवार घडू लागल्याने सामान्य नागरिकांना पाणी पुरवठा वेळेवर होत नसल्याने नगरसेवक मेशू डिकॉस्ता यांनी नाराजी व्यक्त केली. दुपारी साडेबाराच्या दरम्यान भूमिगत केबल घालण्याचे काम सुरू असताना अचानक जलवाहिनी फुटली.

Waste of water
Goa Culture: गाल्फ महोत्सवात कुणबी साडी

याचा परिणाम वालकीणी, भाटी, विळियण भागात होणाऱ्या पाणीपुरवठ्यावर होत असतो. आधीच भाटी पंचायत भागात पाणीप्रश्‍न बिकट आहे. त्यात ही अडचण निर्माण झाली आहे. अजून हे काम किती दिवस चालू राहणार आणि किती वेळा जलवाहिनी फुटणार याचा नेम नसल्याने पाणी पुरवठा खात्याच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी नगरसेवक मेशू डिकॉस्ता यांनी केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com