Ponda: नळाचे कनेक्शन आहे, पण केवळ एक-दोन तास पाणीपुरवठा

Water Shortage: फोंडा तालुक्यातील फोंडा, शिरोडा, मडकई आणि प्रियोळ या चारही मतदारसंघातील नोंदणीकृत सर्वच घरांत नळ कनेक्शन आहे
Ponda Water Shortage
Ponda Water Shortage Dainik Gomantak

Ponda: फोंडा तालुक्यातील फोंडा, शिरोडा, मडकई आणि प्रियोळ या चारही मतदारसंघातील नोंदणीकृत सर्वच घरांत नळ कनेक्शन आहे. प्रत्येक घराला नळाचे कनेक्शन आहे, पण दुर्दैवाची बाब म्हणजे काही ठिकाणी पूर्णवेळ पाणीपुरवठा तर काही ठिकाणी एक तास दोन तास पाणीपुरवठा होतो. मार्चनंतर तर मेपर्यंत फोंडा तालुक्यातील बऱ्याच भागात पाण्याचा टिपूसही नसतो, त्यामुळे मग पाण्याच्या टँकरवर येथील लोकांना विसंबून रहावे लागते.

Ponda Water Shortage
Goa Accident : गुळे काणकोण येथे बांबू नेणारा ट्रक कलंडला

फोंडा तालुक्यात सर्व घरांना नळजोडणी देण्यात आली आहे. या नळजोडणीमुळे प्रत्येक घराला पाणी मिळणे आवश्‍यक आहे, पण नळाच्या पाण्यात सातत्य नसल्याने अजूनही काही लोकांना विहिरींवर विसंबून राहावे लागते.

Ponda Water Shortage
Goa GMC: डीएम एन्डोक्रोनाेलॉजीसाठी जीएमसीत 2 जागांना मंजुरी

अशी आहे स्थिती-

* फोंडा तालुक्यातील बेतोडा भागात तर कायम पाण्याची समस्या आहे. या ठिकाणी नवीन जलयोजना राबवण्यासाठी सध्या कार्यवाही सुरू आहे, त्यामुळे नजीकच्या काळात बेतोडा भागाला पुरेसा पाणीपुरवठा होईल, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.

* प्रियोळ मतदारसंघात केरी तसेच इतर भागातही पाण्याची समस्या असल्याने टँकरचे पाणीपुरवठा.

* तिस्क - उसगाव भागातही नेमकी तीच स्थिती आहे. साधारण मार्च महिना सुरू झाला, की या ठिकाणी पाण्यासाठी लोकांची वणवण सुरू होते.

* शिरोडा मतदारसंघाबरोबरच मडकई, फोंडा आणि प्रियोळ अशा चारही मतदारसंघात पाण्याची समस्या काही पूर्णपणे निकाली निघालेली नाही,

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com