तिलारी धरणातून विसर्ग सुरू; गोव्यातील पाण्याच्या पातळीत वाढ होण्याची शक्यता

नदीकाठच्या दोन्ही राज्यांतील गावांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
Water Release starts from Tilari Dam
Water Release starts from Tilari DamDainik Gomantak

गोव्यात आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुसळधार पावसाने गोवेकरांची तारांबळ उडाली होती. सकाळपासून ठिकठिकाणी पाणी साठले आहे तर अनेक पूल पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे राज्यभरात बऱ्याच ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच आता तिलारी धरणातून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. तिलारी धरणातून पेडणे, म्हापसा अशा ठिकाणी पाणीपुरवठा करण्यात येतो.

आधीच गोव्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यात तिलारीतून विसर्ग सुरू केल्यामुळे गोव्यातील पाण्याच्या पातळीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Water Release starts from Tilari Dam
Goa Live Updates : गोव्यात 'रेड अलर्ट' जारी; धुव्वाधार पावसाने साळावली धरण ओव्हरफ्लो

तिलारी धरण उद्यापर्यंत ओव्हरफ्लो होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे नदीकाठच्या दोन्ही राज्यांतील गावांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, पर्यटकांचे आकर्षण असलेले साळावळी सांगे येथील धरण पूर्णपणे भरले असून सकाळी 10.55 वाजता ते ओसंडून वाहू लागले. 41 मीटर उंच हे धरण असून आज शुक्रवारी सकाळी पाण्याने ही उंची गाठली. हे धरण भरून वाहू लागल्यावर त्याच्यातून उडणारे तुषार पाहणे हे विहंगम दृश्य असते. हे तुषार पाहण्यासाठी हजारो स्थानिक आणि पर्यटक या धरणाला भेट देत असतात.

तर दुसरीकडे, केपे येथील कुशावती नदीला पूर आला असून पारोडा येथे पुलावरून पाणी वाहू लागल्याने रस्ता आणि नदीचे पाणी समान पातळीवर आले आहे. या पाण्याचा प्रवाह प्रचंड असून या मुळे या नदीच्या काठावर असलेल्या पारोडा आणि अवेडे या गावांचा एकमेकांशी संपर्क तुटला आहे.

देऊळमळ केपे येथेही कुशावती नदीची पातळी प्रचंड प्रमाणात वाढली आहे. ही नदी आता प्रचंड वेगात दुथडी वाहू लागली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com