इब्रामपूर, चांदेलच्या रस्त्यावर पाणी

प्रकाश तळवणेकर
गुरुवार, 6 ऑगस्ट 2020

गेल्या दोन दिवसातील मुसळधार पावसामुळे आज पहाटे भरतीच्यावेळी शापोरा व तेरेखोल नदीच्या पाण्याची पातळी वाढून पुराचे पाणी बैलपार, चांदेल, इब्रामपूर, हेदुस, शिरगळ धारगळ तसेच भंडारवाडा पालये येथे रस्त्यावर पाणी आल्याने येथील संध्याकाळपर्यंत वाहतूक बंद पडली. दुपारपासून पाणी कमी होण्याची प्रतिक्रिया सुरू झाली होती.

पेडणे

यामुळे काही ठिकाणी केळींच्या बागायतीची नुकसानी झाली. उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी या भागाला भेट देऊन पहाणी केली. त्यांच्या सोबत उपजिल्हाधिकारी निपाणीकर, मामलेदार अनंत मळीक हे होते. नुकसान झालेल्यांना सरकारी मदत देण्याच्या सूचना केल्या. तसेच वैयक्तिक रित्याही मदत दिली.
सतत मोठ्या प्रमाणात पडणाऱ्या पावसामुळे भरतीच्यावेळी शापोरा व तेरेखोल नदीच्या पाण्याची पातळी वाढून पाणी शेती मळ्यात, केळींच्या बगायतीत व रस्त्यावर आले. शिरगळ धारगळ येथील खरीवाडा भागाला पाण्याने वेढले होते. रस्त्यावर कमरे एवढ्या पाण्यातून लोकाना चालत जावे लागत होते. चांदेल, हेदुस आदी भागात रस्त्यावर पाणी आल्याने उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांना पहाणी करण्या करता महाराष्ट्राच्य हद्दीतील भागातून आलेल्या ठिकाणी जावे लागले.

संपादन - संजय घुग्रेटकर

संबंधित बातम्या