Goa: ऐन चतुर्थीच्या दिवशी उगवे, तांबोसेत मध्ये पाणीटंचाई

उगवे व तांबोसे येथे पंपाद्वारे पाणी खेचण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली
Water scarcity in Ugwe goa
Water scarcity in Ugwe goaDainik Gomantak

पेडणे: उगवे आणि तांबोसे गावांत ऐन चतुर्थीच्या (Ganesh Chaturthi) दिवशी शुक्रवारी गावात नळाला पाणी न आल्याने येथील लोकांचे पाण्याअभावी (Water scarcity) बरेच हाल झाले. यासंबंधी पेडणे पाणीपुरवठा कार्यालय तसेच संबंधित अभियंत्यांना वारंवार प्रयत्न करूनही संपर्क होऊ शकला नाही.

या भागातील लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, उगवे व तांबोसे भागात बंधाऱ्याचे पाणी पंपाद्वारे टाकीत खेचून या दोन्ही भागांत पाणीपुरवठा करण्यात येतो. त्यासाठी उगवे व तांबोसे येथे पंपाद्वारे पाणी खेचण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. पाणी खेचण्यासाठी पाच अश्वशक्तीचे पंप आहेत. वास्तविक या पंपांची क्षमता त्याहून जास्त म्हणजे किमान आठ अश्वशक्तीपेक्षा जास्त असणे गरजेचे आहे.

Water scarcity in Ugwe goa
Goa Mining: खाणी ताब्यात घेण्यास गोवा सरकारकडून टाळाटाळ

उगवेतील अर्धीअधिक घरे ही उंच भागात आहेत. या उंच भागातील बहुतांश घरांतील नळांना कमी दाबाने पाण्याचा पुरवठा होतो. काही महिन्यांपूर्वी चांदेल जल प्रकल्पाची वाहिनी येथीलजलवाहिनी या भागाला पाणीपुरवठा करण्यासाठी जोडली आहे .पण फक्त रात्रीच्यावेळी 11 वाजल्यानंतर हे पाणी सोडण्यात येते. पण ते बऱ्याचदा नियमित येत नाही. हे चांदेल जलप्रकल्पाचे पाणी आलेच तर या पाण्यालाही पुरेसा दाब नसल्याने काहीजणांनाच ते मिळते, तर उंच भागातील लोकांना अजिबात मिळत नाही. ऐन चतुर्थीच्या काळात नळाला पाणी न आल्याने उगवे व तांबोसे भागातील लोकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली असून याचा जाब विचारण्यासाठी पेडणे पाणीपुरवठा कार्यालयावर धडक देण्याचा इशाराही स्थानिक रहिवाशांनी दिला आहे.

Water scarcity in Ugwe goa
Goa: Taxi Meter न बसवण्यावर ठाम तर गोवा माईल्सहि रद्द करा: सुदीप ताम्हणकर

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com