नेरूल गावामध्ये कोरोना संकटाबरोबर एक नविन संकट उभे...

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 18 नोव्हेंबर 2020

या भागात गेल्या पंधरा दिवसापासून अनियमित पाणीपुरवठ्यामुळे पाण्याची समस्या बिकट चालली आहे .आगोदरच कोरोना महामारीच्या संकटामुळे परिस्थिती एकदमच कठीण होऊन बसली आहे

पर्वरी : नेरूल गावामध्ये कोरोना संकटाबरोबर एक नविन संकट उभ राहिले आहे .नोव्हेबर महिन्यातच  पाणी टंचाई भेंडसावू लागली आहे .त्यामुळे घोटभर पाण्या साठी महिलांची  वणवण सुरू झाली आहे.या प्रकरणात सुस्त आणि निष्क्रिय पाणी पुरवठा अधिकारी जबाबदार आहेत असा आरोप नेरूल ग्रामस्थ करीत आहे. नेरूल व वेरे गावात निर्माण झालेली पाण्याची समस्या सद्या सुटण्याऐवजी अधिक गंभीर होत आहे.

या भागात गेल्या पंधरा दिवसापासून अनियमित पाणीपुरवठ्यामुळे पाण्याची समस्या बिकट चालली आहे .आगोदरच कोरोना महामारीच्या संकटामुळे परिस्थिती एकदमच कठीण होऊन बसली आहे व  त्यातच पाण्याची टंचाई होत असल्यामुळे नेरूल  सरपंच पंच सदस्यांनी वेळोवेळी तक्रार करूनही पाणीपुरवठा अधिकाऱ्याकडून पाणी जाणीव पूर्वक दुर्लक्ष करण्यात येत आहे, असा आरोप सामजिक कार्यकर्ते व  पंचसदस्य संदीप होबले यानी केला आहे.काही पंधरा दिवसापूर्वी आमदार जयेश साळगावकर यांच्या प्रयत्नामुळे नवीन पाण्याचा मोटर पॉम्प बसविण्यात आला होता , असे असुनसुद्धा नेरूल गावात सध्या पिण्याचे पाणी मिळत नसल्याने नेरूल ग्रामस्ताने नाराजी व्यक्त केली आहे .नेरूल गावात पाणी न वळवता अन्या ठिकाणी पाण्याची पुरवण करत असल्याचा संशय श्री होबले यानी व्यक्त केला आहे  आहे .

 त्याचप्रमाणे  पिण्याचे शुध्द पाणी मिळत नसल्याने महिला भगिनी वण वण फिरत आहे .काहीवेळ्या  नळातून गडुळ पाणी येत आहे.अशावेळी पर्वरी पाणी पुरवठा कार्यालयाकडे तक्रारी केल्यानंतर अधिकरी या समस्यांकडे लक्ष देत नसल्याने येथील महिलांनी नाराजी व्यक्त केली आहे.

गमतीचा भाग असा की ,नेरूल गावात सुरळीत पाणी पुरवठा का होत नाही असा प्रश्न उपस्थित केला असता,  अधिकारी मात्र वीज पुरवठा नाही किंवा कुठेतरी पंपात  बिधाड झाल्याचे कारण सांगण्यात येत आहे.त्यामूळे पाणी पुरवठा  अधिकाऱ्याने नेरूल गावच्या नागरिकांचा पुन्हा अंत पाहू नये,  त्वरित पाणी पुरवठा सुरळीत करावा असे आव्हान केले आहे .

संबंधित बातम्या