Goa Water Project: 'आयुष हॉस्पिटल'कडे पाणी वळवल्याने मांद्रेत पाणी टंचाई

Goa: तुये येथे 30 एमएलडी क्षमतेचा पाणी शुद्धीकरण प्रकल्प मार्गी लागत आहे.
Jit Arolkar
Jit Arolkar Dainik Gomantak

Goa Water Project: चांदेल पाणी प्रकल्पातील एक एमएलडी पाणी आयुष हॉस्पिटलकडे वळविल्याने मांद्रे (Mandrem) मतदारसंघात पाणीपुरवठा कमी होत असल्याचे कबुली आमदार जीत आरोलकर यांनी दिली. तुये येथे 30 एमएलडी क्षमतेचा पाणी शुद्धीकरण प्रकल्प मार्गी लागत आहे. तो पूर्ण झाल्यानंतर पाणी समस्या सुटेल, असे त्यांनी सांगितले.

तत्पूर्वी, आगरवाडा येथे एका विहिरीवर पंप बसवून ते पाणी पुरविणे शक्य आहे. याची चाचपणी करण्याचे आदेश त्यांनी पाणीपुरवठा खात्याच्या अधिकाऱ्यांना दिले. आमदार आरोलकर यांनी आगरवाडा-चोपडे पंचायतीला भेट देऊन पंचांकडून समस्या जाणून घेतल्या. यावेळी सरपंच ॲन्थनी फर्नांडिस, पंच हेमंत चोपडेकर, संगीता नाईक, लिंगुडकर, सचिन राऊत, सचिव करिष्मा मोरजकर, गटविकास कार्यालयाचे प्रतिनिधी फटूसिंग शेटगावकर, आरोलकर यांचे स्वीय सचिव एम.डी. नाईक उपस्थित होते.

Jit Arolkar
Gomantak Exclusive: लोकसभेवेळीही सरकारविरोधात उभा ठाकणार- विजय सरदेसाई

पंचायत क्षेत्रात कचरा समस्या डोके वर काढत असून त्यावर उपाययोजना करण्याची गरज व्यक्त करून आरोलकर यांनी कचरा कर आकारण्याची सूचना पंचायत मंडळाला केली. आगरवाडा येथील तळी दुरुस्त करून त्या पाण्याचा उपयोग करण्याची मागणी पंच सचिन राऊत यांनी केली.

पंचायत क्षेत्रातील अंतर्गत रस्ते लवकरच हॉटमिक्स डांबरीकरण करण्यात येतील. चोपडे-मोरजी मार्गावरील सायकल ट्रॅक निरूपयोगी ठरला असून त्याजागी रस्ता रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात येईल, असेही आरोलकर यांनी सांगितले.

Jit Arolkar
Goa Election मध्ये कोटीच्या कोटी उड्डाणे! TMC अव्वल, खर्च तब्बल...

रोषणाईचे बिल पंचायतीच्या माथी

चोपडे पुलाच्या प्रवेशद्वारावर पर्यटन खात्यातर्फे सुशोभीकरण केले आहे. मतदारसंघातील प्रत्येक गावाचे वैशिष्ट्य सांगणारी शिल्पे येथे तयार करण्यात येतील. यापूर्वी पर्यटन खात्याने या ठिकाणी विद्युत रोषणाई केली होती. त्याचे लाखो रुपयांचे बिल पंचायतीला पाठवले आहे. त्यावर तोडगा काढण्याची ग्वाही आरोलकर यांनी दिली

शौचालय नसल्याने नागरिकांची गैरसोय

चोपडे येथे कुर्बान वाड्यावर शौचालय नसल्याने लोकांची विशेषत: महिलांची गैरसोय होते. या ठिकाणी शौचालय बांधण्याची मागणी करण्यात आली. येथील क्रीडा मैदानाची दुरुस्ती करण्यासाठी प्रयत्न सुरू असून क्रीडामंत्री गोविंद गावडे यांच्यासोबत या मैदानाची पाहणी करून निर्णय घेण्यात येईल, असे आरोलकर यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com