Goa VACCINATION
Goa VACCINATION

"गोमंतकीयांना लस मिळण्याचा मार्ग मोकळा"

पणजी: कोविड प्रतिबंधक लसींसाठी (Covid-19 Vaccine) जागतिक निविदा मागविण्यापूर्वी इतर राज्ये कोणता मार्ग अवलंबतात यावर सरकारचे लक्ष आहे. 18 ते 45 वयोगटासाठी लसी उपलब्ध करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. आता लसीकरण केंद्रावरच (vaccination Center) नोंदणी होणार असल्याने गोमंतकीयांनाच लस मिळण्याचा मार्ग मोकळा झाला झाल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Chief Minister Pramod Sawant) यांनी सांगितले. (Registration will be done only at the vaccination center in Goa)

शेजारील महाराष्ट्र सरकारने कोविड प्रतिबंधात्मक लस विकत घेण्यासाठी जागतिक निविदा मागवली होती. मात्र त्याला प्रतिसाद मिळाला नाही. लस उत्पादक कंपन्या केंद्र सरकारशी थेट वाटाघाटी करत असल्यामुळे राज्य सरकारांशी ते वाटाघाटी करत नाहीत याकडे लक्ष वेधले असता मुख्यमंत्री म्हणाले, अशा साऱ्या परिस्थितीवर सरकारचे लक्ष आहे.

इतर राज्ये लस मिळवण्यासाठी कोणती पावले टाकतात. त्यांना यश येत आहे का? याची माहिती मिळवली जात आहे. त्यांच्या अनुभवातून शिकत सरकार लस मिळवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. आता कोणत्याही ॲपवर नव्हे, तर लसीकरण केंद्रावर जाऊन नोंदणी करून 18 ते 45 वयोगटातील नागरीकांना लस घेता येणार असल्याने राज्याबाहेरून कोणी लस घेण्यासाठी येण्याचा प्रश्नच नाही. लसीकरण केंद्रावर तसा कोणी प्रयत्न केला तर लोकांच्या तो लगेच लक्षात येणार आहे.  सामुदायिकरीतीने ॲपवर नोंदणी केल्यास काय स्थिती उद्‍भवते याची माहिती केंद्र सरकारच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर आता लसीकरण केंद्रावर नोंदणीचा पर्याय देण्यात आला आहे.                                                                                               

मंगळवारी राज्यात 39 जणांचा मृत्यू
राज्यात गेल्या चोवीस तासांत कोरोनाबाधित 39 रुग्णांचा मृत्यू झाला.  19 जण गोवा वैद्यकीय महाविद्यालय बांबोळी येथे मृत्युमुखी पडले तर दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळांमध्ये 11 जणांनी आज शेवटचा श्वास घेतला. मडगाव येथील इएसआय इस्पितळांमध्ये 1, केपे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये 1, कोलवाळ येथील शहरी आरोग्य केंद्रामध्ये 1,  मडगाव येथील हॉस्पसियो इस्पितळांमध्ये 1, तर  गॅलेक्सी व आर जी स्टोन या उत्तर गोव्यातील दोन इस्पितळांमध्ये प्रत्येकी 1  आणि दक्षिण गोव्यातील व्हिक्टर,  त्रिमूर्ती व एस्टर या इस्पितळात प्रत्येकी 1 जण असे कोरोना बाधित मृत्यू पावले आहेत.

राज्यात गेल्या आठ दिवसांमध्ये जे नवे 14692 कोरोनारुग्ण सापडले त्यातील 10 हजार 514 जणांनी घरीच अलगीकरणात राहून कोरोनावर उपचार घेण्याचे ठरवले आहे. तर गेल्या आठ दिवसांमध्ये  फक्त 1480 कोरोनाबाधित इस्पितळात दाखल झाले आहेत. यावरून राज्यांमध्ये कोरोनाची बाधा झाल्यानंतर घरीच अलगीकरणात राहून  कोरोनावर उपचार घेणाऱ्यांची संख्या बरीच मोठी असल्याचे स्पष्ट होत आहे. आरोग्य खात्याने आज दिलेल्या माहितीनुसार आज  राज्यात 5044 कोरोना तपासणी करण्यात आली. आज जाहीर झालेल्या अहवालानुसार 1549 नवे कोरोना बाधित  सापडले तर 2082 कोरोना बाधित बरे होऊन घरी गेले आहेत. कोरोना बाधित बरे होण्याची टक्केवारी राज्यात वाढलेली असून ती आज 87.84 टक्के एवढी आहे. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com