स्वयंपूर्ण गोव्यासाठी मुख्यमंत्र्यांनी घेतलेले निर्णय स्वागतार्ह

We appreciate the decisions taken by CM in order to make Goa Self - Sufficient
We appreciate the decisions taken by CM in order to make Goa Self - Sufficient

डिचोली :  भाजप हा सामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष असून, कार्यकर्त्यांच्या बळावरच भाजप वाढत आहे. समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोचणे, हे भाजपचे ध्येयधोरण आहे. कार्यकर्त्यांची प्रगती पाहूनच त्यांच्यावर जबाबदारी सोपविली जाते. निश्‍चित ध्येयधोरणाला अनुसरुन पक्षाची वाटचाल सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘आत्मनिर्भर भारत’ स्वप्नपूर्तीसाठी गोवा राज्याला स्वयंपूर्तीकडे नेण्याचा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ध्यास घेतला असून, तशी दूरदृष्टी ठेवून मुख्यमंत्र्यांनी मार्गक्रमण सुरु केले आहे. त्यादृष्टीने त्यांनी घेतलेले निर्णय स्वागतार्ह आहेत, असे भाजपचे प्रवक्‍ते प्रेमानंद महांबरे यांनी डिचोली तालुका भाजपने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. 

‘आत्मनिर्भर भारत आणि स्वयंपूर्ण गोवा’ संकल्पनेंतर्गत सरकारच्या प्रत्येक योजना तळागाळात पोचवून कृषी, दुग्ध आदी विविध व्यवसायात पुढे आणून युवक, महिल स्वयंसहाय आदी गटांना आत्मनिर्भर बनविण्याचा मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला आहे. मंत्रीमंडळाच्या निर्णयानुसार आता नोव्हेंबर महिन्यापासून प्रत्येक शनिवारी  सरकारी अधिकारी अर्थातच ‘स्वयंपूर्ण मित्र’ प्रत्येक पंचायतीत उपस्थित राहून युवक, महिला गट आदींना मार्गदर्शन आणि सहकार्य करणार आहेत. त्याचबरोबर ‘कोविड’ संकटकाळात ज्येष्ठ नागरिकांसह महिलांना दिलासा देताना दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेंतर्गत हयात दाखला तसेच गृहआधार योजनेंतर्गत हयात आणि उत्पन्न दाखला यावर्षी देण्याची गरज नसल्याचा निर्णय घेतला आहे.

त्याचबरोबर शिधापत्रधारकांना ३२ रुपये किलो याप्रमाणे प्रत्येकी तीन किलो कांदे वितरीत करण्याचा मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी घेतलेल्या निर्णयामुळे सामान्य जनतेला निश्‍चितच दिलासा मिळणार आहे. असे श्री. महांबरे यांनी नमूद करून हे निर्णय महत्त्वाचे असल्याचे स्पष्ट केले. या निर्णयांचे डिचोली तालुका भाजपने स्वागत करून मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले.

काल सायंकाळी डिचोली येथे घतलेल्या या पत्रकार परिषदेस डिचोली भाजप मंडळाचे अध्यक्ष विश्वास गावकर, मये भाजप मंडळाचे अध्यक्ष दयानंद कारबोटकर,साखळी भाजप मंडळाचे अध्यक्ष गोपाळ सुर्लकर, मये भाजप मंडळाचे विश्वास चोडणकर, भाजपच्या राज्य समितीच्या सचिव आरती बांदोडकर, महिला मोर्चा राज्य समितीच्या उपाध्यक्ष स्वाती माईणकर, सरचिटणीस शिल्पा नाईक, सचिव तन्वी सावंत, मये, लाटंबार्से आणि कारापूर-सर्वण जिल्हा पंचायत मतदारसंघातील भाजपचे उमेदवार शंकर चोडणकर, श्रुती घाटवळ आणि महेश सावंत उपस्थित होते. यावेळी शिल्पा नाईक यांनी स्वस्त दरात कांदा वितरीत करण्याच्या सरकारचा निर्णय स्तुत्य आणि दिलासादायक असल्याचे म्हटले. तर मुख्यमंत्र्यांवर होत असलेली टिका वैफल्यग्रस्तेतून होत असल्याचे गोपाळ सुर्लकर यांनी नमूद केले

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com