RSS Meet Goa: 'हमारा हिंदू राष्ट्र है'; सरसंघचालक मोहन भागवत यांचे गोव्यात वक्तव्य

आपण स्वत:ला काहीही मानत असलो तरी आपला पूर्वजांशी संबंध आहे. आणि जग त्यांना हिंदू म्हणून ओळखते
RSS chief Mohan Bhagwat in Goa
RSS chief Mohan Bhagwat in GoaDainik Gomantak

Goa : "आपल्या देशात पहिल्यापासून मतमतांतरे आहेत, विविध शास्त्रे आहेत. असे सगळे असून देखील आपण एक राष्ट्र आहोत, एक समाज आहोत, आपण हिंदू समाज आहोत आणि आपले हिंदू राष्ट्र आहे. आपण सर्व भारतमातेचे पुत्र आहोत." असे वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले. पणजी, गोवा येथे शनिवारी (दि.07) आयोजित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात भागवत यांनी उपस्थित संघाच्या कार्यकर्त्यांना संबोधित केले.

(RSS Chief Mohan Bhagwat Speech In Panaji, Goa)

RSS chief Mohan Bhagwat in Goa
Mohan Bhagwat RSS: सर्व भारतीयांचा डीएनए एकच ! संघ हे राष्ट्रभक्ती निर्माण करणारे संघटन -मोहन भागवत

सरसंघचालक मोहन भागवत यांच्या जाहीर सभेला संघासह भाजप, विश्‍व हिंदू परिषद, दुर्गा वाहिनी, बजरंग दल आदी संघटनांचे कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत सपत्नीक उपस्थित होते. याशिवाय केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक, मंत्री सुदिन ढवळीकर, विश्‍वजीत राणे, दिव्या राणे, रोहन खंवटे, सुभाष शिरोडकर, सुभाष फळदेसाई, नीळकंठ हळर्णकर, सभापती रमेश तवडकर, आमदार दिगंबर कामत, जीत आरोलकर, भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, नरेंद्र सावईकर, उद्योगपती श्रीनिवास धेंपे, दत्तराज साळगावकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

RSS chief Mohan Bhagwat in Goa
Goa Politics: मोहन भागवत यांच्या पणजीतील सभेला मंत्री, आमदारांची गणवेशात ‘हजेरी’

काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत?

"भारत पहिल्यापासून एक विविधतेचे राष्ट्र म्हणून ओळखले जाते. आपल्याकडे सगळ्या विविधतेचे स्वागत आहे करण या सर्व विविधता एकच सत्याचा अविष्कार आहेत. जगात 'विविधतेत एकता' असे म्हटले जाते पण, आम्ही 'एकतेची विविधता' पहिल्यापासून अनुभवली आहे. सगळ्या भाषा, सगळे पंथ, उपपंथ, देवी देवता, खाद्य संस्कृती, रिती रिवाज, मतमतांतरे, विविध विचार आहेत, विविध शास्त्रे आहेत. से सगळे असून देखील आपण एक राष्ट्र आहोत, एक समाज आहोत, आपण हिंदू समाज आहोत आणि आपले हिंदू राष्ट्र आहे. आपण सर्व भारतमातेचे पुत्र आहोत. "

RSS chief Mohan Bhagwat in Goa
Mohan Bhagwat: संघाला नाही तर देशाला मोठे करण्यासाठी RSS मध्ये सामील व्हा- मोहन भागवत

चाळीस हजार वर्षांपासून सर्व भारतीयांचा डीएनए एकच

"अनेक विविधता असल्या तरी आपण सगळे एक आहोत, चाळीस हजार वर्षांपासून आपला डीएनए एकच आहे. ‘यथा राजा, तथा प्रजा’ या नियमानुसार आमची भाषा, पेहराव भिन्न असले, तरी आपण सगळे एक आहोत. आज आपण स्वत:ला काहीही मानत असलो तरी आपला पूर्वजांशी संबंध आहे. आणि जग त्यांना हिंदू म्हणून ओळखते. त्यामुळे आपला हिंदू समाज आहे, आपले राष्ट्र हिंदू राष्ट्र आहे. आपल्या सर्वांना जोडणारी हीच एक गोष्ट आहे. बाकी आपल्या भाषा, पूजा, प्रांत हे सर्व वेगवेगळे आहेत. या विविधतेलाच आपण आपला अलंकार मानतो."

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com