Goa Elections: कुंभारजुवे मतदारसंघांमध्ये आपलेच प्राबल्य;पांडुरंग मडकईकर

जुने गोवे येथे एका कार्यक्रमादरम्यान बोलताना मडकईकर यांना कुंभारजुवेतील येत्या विधानसभा निवडणुकीबाबत विचारले असता त्यांनी प्रतिक्रिया दिली.
Goa Elections: कुंभारजुवे मतदारसंघांमध्ये आपलेच प्राबल्य;पांडुरंग मडकईकर
Goa Elections: कुंभारजुवे मतदारसंघांमध्ये आपलेच प्राबल्य;पांडुरंग मडकईकरDainik Gomantak

पणजी: कुंभारजुवे मतदारसंघांमध्ये आपले प्राबल्य आहे. कितीही नवे उमेदवार आपल्या विरुद्ध उभे राहिले तरी आपली एक गठ्ठा मते आपल्याच बाजूने राहणार आहेत. इतर उमेदवारांची मते विभागली जातील आणि आपल्याला त्याचा फायदाच होईल. अशी प्रतिक्रिया कुंभारजुवे मतदारसंघाचे आमदार पांडुरंग मडकईकर यांनी आज दिली आहे. जुने गोवे येथे एका कार्यक्रमादरम्यान बोलताना मडकईकर यांना कुंभारजुवेतील येत्या विधानसभा निवडणुकीबाबत विचारले असता त्यांनी वरील प्रतिक्रिया दिली.

जुने गोवे येथे एका कार्यक्रमादरम्यान बोलताना मडकईकर यांना कुंभारजुवेतील येत्या विधानसभा निवडणुकीबाबत विचारले असता त्यांनी वरील प्रतिक्रिया दिली. आपण गेल्या अनेक वर्षांमध्ये कुंभारजुवेत केलेल्या विकास कामामुळेच येथे आपण सातत्याने विविध पक्षांच्या उमेदवारीवर निवडून आलेलो आहे. येत्या निवडणुकीत सुद्धा भाजप आपणालाच उमेदवारी देईल, याची खात्री आहे . जर पक्षाने आपल्या पत्नीला उमेदवारी देण्याचे ठरवले तर आपण पक्षाच्या या निर्णयासोबत राहणार आहे. मात्र इतर कुणाला उमेदवारी दिली तर पक्षाशी चर्चा करून पुढील निर्णय घेणार आहे. असेही मडकईकर यांनी यावेळी सांगितले.

Goa Elections: कुंभारजुवे मतदारसंघांमध्ये आपलेच प्राबल्य;पांडुरंग मडकईकर
गोव्यात पर्यटन खात्यातर्फे बांधण्यात आलेल्या हेलिपॅड चे उदघाटन

सिध्देश नाईक हे त्याचे वडील केंद्रीय मंत्री असल्यामुळे दावेदारी करत आहेत. त्यांना उमेदवारी दिली तर आपण पक्षाची चर्चा नक्कीच करीन. पण निर्णय शेवटी आपल्या समर्थकांना विचारून घेणार असल्याचेही यावेळी मडकईकर यांनी सांगितले. अनेक इच्छुकाबाबत बोलतांना मडकईकर यांनी सांगितले की यापूर्वीही असे इच्छुक निवडणुकीच्या तोंडावर तयार व्हायचे. पण मग पैसे घेऊन गप्प बसतात. असा खुलासा आमदार मडकईकर यांनी केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com