गोवा सरकारच्या निर्णयाविरोधात न्यायालयात दाद मागू - खनिज निर्यातदार संघटना

गोवा खनिज निर्यातदार संघटना झाली सक्रिय
गोवा सरकारच्या निर्णयाविरोधात न्यायालयात दाद मागू - खनिज निर्यातदार संघटना
Goa Mineral Exporters AssociationDainik Gomantak

मडगाव : गोव्यातील 88 खनिज लिज धारकांना त्यांच्या ताब्यात असलेल्या जमिनी परत सरकारच्या ताब्यात द्या अशा आशयाच्या नोटिसा पाठविल्या आहेत त्यावर  खनिज निर्यातदार संघटनेने आम्ही आमची बाजू सरकारकडे मांडू आणि गरज पडल्यास या निर्णया विरोधात न्यायालयात दाद मागू अशी अधिकृत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. (We will be appeal to the court against the decision of Goa government )

या संघटनेचे सचिव ग्लेन कालावंपारा यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात अजून या संबंधी आदेश जारी झालेला नाही. मात्र आमच्या काही सदस्यांना याबद्दलच्या नोटिसा मिळाल्या आहेत अशी माहिती मिळाल्याचे सांगितले.

या संबंधीची प्रकरणे सध्या उच्च न्यायालयात प्रलंबित आहेत असे सांगून आम्ही आमची बाजू सरकारपुढे प्रभावीपणे मांडू आणि गरज पडल्यास न्यायालयातही दाद मागू असे त्यांनी म्हटले आहे. या संदर्भात लिजधारक कंपन्याकडे प्रतिक्रियेसाठी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.