Water Issues: पाणी समस्येवर लवकरच तोडगा काढू- काब्राल

पेडणे आणि बार्देश येथे लहान जल प्रकल्प
Water Issues in Goa
Water Issues in GoaDainik Gomantak

तिळारी जल प्रकल्पाच्या कालव्याचे डागडुजीचे काम सुरू असल्याने बार्देश तालुक्यात पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. तिळारीतून पाणीपुरवठा थांबल्यानंतर पर्वरीलादेखील पाणी अस्नोडा जलशुद्धीकरण प्रकल्पातून द्यावे लागते. (Water Issues in Goa)

त्यामुळे तालुक्यातील इतर भागांवर परिणाम होतो. समस्येचे निवारण करण्यासाठी अनेक ठिकाणी लहान जल प्रकल्प निर्माण केले जातील.

पुढील दोन ते तीन वर्षांत पाणी समस्येवर तोडगा निघणार आहे, असे उत्तर सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्राल यांनी विधानसभेत दिले. लक्षवेधी सूचनेवर ते बोलत होते.

चांदेल येथे १५ एमएलडी, अस्नोडा येथे ३० एमएलडी, पिळर्ण येथे १५ एलएमडी, तुये येथे ३० एलएमडी आणि शिवोली येथे जल प्रकल्प येणार आहेत. त्यामुळे भविष्यात तिळारी जलप्रकल्पाचे पाणी थांबले तरी बार्देश आणि पेडणे तालुक्यातील लोकांना सुरळीत पाणीपुरवठा होणार आहे.

पर्वरी येथे जल प्रकल्प आहे; परंतु तिळारीतून पाणी थांबल्यानंतर यावर परिणाम होतो. पाण्याच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी जलस्रोत मंत्र्यांसोबत समन्वय साधून तिळारी जल प्रकल्पात पाणी पंप करून सोडण्यासाठी जलवाहिनीचे काम सुरू आहे, असे काब्राल यांनी सांगितले.

Water Issues in Goa
Goa Petrol-Diesel Price : गोव्यातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरात किरकोळ घट, जाणून घ्या आजचे दर

आज गोव्यात उंच डोंगरांवर घर बांधण्याची जणू पद्धत झाली आहे. पाण्याच्या टाकीवरती घर बांधल्यास साहजीकपणे पाणी वर चढण्यासाठी जोर लागणार आहे. जोर नसल्यास पाणी वर जाणार नाही. त्यासाठी हळदोणे मतदारसंघातील खोर्जुवे येथील टाकी बांधण्यासाठी जमिनीची आवश्‍यकता आहे. मग टाकीत पाणी पंप करता येईल.

- नीलेश काब्राल, सार्वजनिक बांधकाममंत्री

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com