शिक्षण क्षेत्राचे भविष्य आणि पुढील मार्ग या विषयावर वेबिनार.

dainik gomantak
सोमवार, 1 जून 2020

हा वेबिनार खरोखर एक उत्कृष्ट उपक्रम होता. बौद्धिक लोकांच्या उत्कृष्ट पॅनेलमधील सदस्यांनी आम्हाला सांगितलेल्या कल्पना आणि मते जाणून आम्हाला आनंद झाल्याचे बीएनआय-गोवाचे कार्यकारी संचालक राजकुमार कामत म्हणाले.

पणजी, 
सध्या गोव्यामध्ये कोविड 19 चे रुग्ण वाढत असले तरी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या सक्षम नेतृत्वामूळे तसेच शिक्षण खात्याच्या मदतीने अनेक शैक्षणिक संस्था ऑनलाईन पद्धतीने शैक्षणिक वर्ष सुरू करण्यास उत्सुक आहेत. तर काही संस्थांनी ऑनलाईन वर्ग सुरू देखील केले आहेत. सध्या शिक्षण व्यवस्था अनेक बदलातून जात आहे तरी देखील येणाऱ्या भविष्यात यामध्ये आणखीन अनेक बदल होणार आहेत. जे की विद्यार्थी तसेच शिक्षकांनाही नवे असतील.याविषयी अधिक माहिती देण्यासाठी बीएनआय गोवा विभागाने 28 मे 2020 रोजी शिक्षण क्षेत्राचे भविष्य या विषयावर वेबिनार आयोजित केला होता. या यशस्वी वेबिनारमध्ये गोव्यातील अनेक शिक्षण संस्थांच्या प्रतिनिधींनी भाग घेतला होता.
या वेबिनारच्या पहिल्या भागात शिक्षण क्षेत्रातील तज्ञांनी शिक्षण क्षेत्राचे भविष्य आणि पुढील मार्ग या विषयावर मार्गदर्शन केले तर दुसऱ्या भागात या वेबिनारमध्ये सहभागी झालेल्या व्यक्तीसोबत याच विषयावर सखोल चर्चा करण्यात आली.तंत्रज्ञान आणि नाविन्य यांचा पुरस्कार करणाऱ्या बीएनआय ने हा सर्व कार्यक्रम चांगल्या पद्धतीने पार पाडला.
यामध्ये तंत्र शिक्षण विभागाचे संचालक डॉ विवेक कामत,उच्च शिक्षण संचालक प्रसाद लोलयेकर यांच्या वतीने प्रा विठ्ठल तिळवी,न्यु एज्युकेशन संस्थेचे प्रदीप काकोडकर,सन शाईन संस्थेचे दीपक खैतान, गोवा वास्तुशास्त्र महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ आशिष रेगे, दामोदर कोलेजच्या प्राचार्या प्रिता मल्ल्या, पार्वतीबाई चौगुले महाविद्यालयाचे डॉ नंदकुमार सावंत, माउंट लिटेरा झी स्कुलच्या संध्या व्यंकटेश एस एस डेम्पो कॉलेजच्या प्राचार्या राधिका नायक, मारीटीम संस्थेचे प्राचार्य दीपक शहा, न्याय विकास शाळेचे गौतम खरंगटे गोवा अभियांत्रिकी कॉलेजचे डॉ गणेश
हेगडे ज्ञानप्रसारक मंडळचे प्रा दिलीप आरोळकर नेव्ही चिल्डरन स्कुलच्या अनुपमा मेहता आग्नेल शिक्षण संस्थेचे फा अँथोनी कास्टीलो आणि इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट केटरिंग टेकक्नॉलॉजी अँड अप्लाइड न्यूट्रिशनच्या प्राचार्य डोना डिसोझा उपस्थित होते.
“हा वेबिनार खरोखर एक उत्कृष्ट उपक्रम होता. बौद्धिक लोकांच्या उत्कृष्ट पॅनेलमधील सदस्यांनी आम्हाला सांगितलेल्या कल्पना आणि मते जाणून आम्हाला आनंद झाल्याचे बीएनआय-गोवाचे कार्यकारी संचालक राजकुमार कामत म्हणाले. अधिक लोकांपर्यंत हि माहिती पोहचविण्याच्या दृष्टिकोनातून या वेबिनारचे आम्ही फेसबुकवरुन हे वेबिनार थेट प्रक्षेपण केले असल्याचेही त्यांनी सांगितले.

संबंधित बातम्या