स्मार्ट सिटी विकास महामंडळाचे संकेतस्थळ अद्याप अपलोड नाही!

दैनिक गोमंतक
बुधवार, 25 नोव्हेंबर 2020

इमेजिन पणजी स्मार्ट सिटी विकास लिमिटेड (आयपीएससीडीएल) या महामंडळाचे संकेतस्थळ अद्याप अपलोड केले जात नाही.

पणजी: इमेजिन पणजी स्मार्ट सिटी विकास लिमिटेड (आयपीएससीडीएल) या महामंडळाचे संकेतस्थळ अद्याप अपलोड केले जात नाही. अजूनही या संकेतस्थळावर मुख्य कार्यकारी अधिकारी स्वयंदीप्ता पाल चौधरी हेच असून मंडळातील सदस्यही जुनेच आहेत.

आयपीएससीडीएल या महामंडळाच्या सीईओपदावरून चौधरी यांना हटविल्यानंतर त्यांच्या जागी आलेल्या आयएएस अधिकारी हेमंत कुमार यांची वर्णी त्या जागी लागली. त्यानंतर काही दिवसांनी नव्या संचालक मंडळाची निवड जाहीर झाली, त्या मंडळात आमदार बाबूश मोन्सेरात आणि महापौर उदय मडकईकर यांचा समावेश करण्यात आला. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली १९ रोजी बैठक पार पडली.

त्या बैठकीत आयपीएससीडीएलने केलेल्या कामाचा आढावा घेतला.  मंडळाची एक बैठक होऊनही आयपीएससीडीएल महामंडळाच्या संकेतस्थळावरील माहिती अपडेट का होत नाही, हे न समजण्यासारखे आहे. अजूनही इमेजिन पणजीच्या संकेतस्थळावर स्वयंदीप्तापाल चौधरी मुख्य कार्यकारी अधिकारी असल्याचे दिसून येते. त्याशिवाय जुन्याच चालक मंडळातील सदस्यही दिसून येते. संकेतस्थळाला कितीजणांनी भेट दिली, त्याविषयी आकडेवारी मात्र संकेतस्थळावर अपलडो होत असावी.

संबंधित बातम्या