गोव्यातल्या डेस्टिनेश वेडिंगला लॉकडाऊनचा खो; गोवेकरांची लग्नंही लांबणीवर

Wedding ceremonies postponed due to lockdown in Goa
Wedding ceremonies postponed due to lockdown in Goa

देशभर कोरोनाचा संसर्ग जसजसा वाढत चालला तस तसे निर्बंध आणखी कडक केले जात आहेत. गोव्यात राज्य सरकारच्या आदेशावरून प्रशासनाने नाईट कर्फ्यू लागू केला होता. आणि आता गोव्यात लॉकडाउन जाहीर करण्यात आले आहे. कोविडच्या दुसऱ्या लाटेनंतर कोरोनाचा संसर्ग अतिवेगाने फैलावत असल्याने पुन्हा एकदा ऐन लग्नसराईच्या मोसमात मोठी समस्या निर्माण झाली असून मागील वर्षीप्रमाणेच यंदाही गोव्यातील शुभकार्ये अडचणीत आली आहेत. त्यामुळे लग्नाच्या बोहल्यावर चढण्याची घाई लागलेल्या नव वधू-वरांसह दोन्ही पक्षाकडील मंडळींपुढे मोठी समस्या निर्माण झाली आहे. गर्दी टाळून आणि सामाजिक नियम पाळून शुभकार्ये करण्यास परवानगी असली, तरी विवाह सोहळे धुमधडाक्‍यात साजरे करता येणार नसल्याने वधू-वर पक्षाकडील मंडळींमध्ये निरूत्साहाचे वातावरण तयार झाले आहेत. लग्नकार्यासाठी बुकींग केलेले हॉल तसेच कॅटरींग, बॅंजो आदी ऑर्डरी सध्या रद्द केल्याची माहिती मिळाली आहे. डेकोरेटर्स, कॅटरींग, बॅंडवाले आदी लहान-सहान घटकही अडचणीत आले आहेत. (Wedding ceremonies postponed due to lockdown in Goa)

टाळेबंदीत शिथिलता आणि कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर मागील वर्षी नोव्हेबर महिन्यापासून तुळशी विवाहानंतर लांबणीवर पडलेल्या लग्नकार्यासह नवीन लग्नकार्यांचे बार उडायला सुरवात झाली होती. आता दैनंदिन व्यवहार थोडे फार सुरू असले तरी, या महिन्यात लग्न करण्याच्या तयारीत असलेल्यांची चिंता वाढली आहे. लोकांनी पत्रिकांचे वाटप केले आहे. लग्नाची जय्यत तयारी केली आहे, तेव्हा आता हा लग्नाचा मूहुर्त कसा बदलायचा, असा मोठा प्रश्न त्यांच्यापुढे उपस्थित झाला आहे. प्रशासनाकडून आदेश काढताच वधू-वर पक्षात लग्नाची तारीख बदलण्याबाबत चर्चा सुरू झाली आहे. मुळात एप्रिल आणि मे महिना वेडिंग सिझन असतो. पण, कोरोनामुळं प्रोग्राममधील मर्यादित संख्येने आणि रात्रीच्या कर्फ्यूमुळे चिंता वाढली आहे. लग्न ठरविलेली मंडळी मंगल कार्यालयांना कॉल करत आहेत आणि वेळे आणि तारीखेत बदल करण्याची विनंती करत आहेत.

प्रिवेडिंग शुट साठी येणाऱ्या आणि डेस्टिनेशन वेडिंगसाठी येणाऱ्या नागरीकांवर आणि पर्यटकांवर या लॉकडाउनचा बऱ्यापैकी परिणाम झाला आहे. जर 100 जणांची परवाणगी दिली असेल तर त्यांच्या राहण्याचा, खाण्या-पिण्याचा, फिरण्याचा खर्च त्यासाठी लागण्याऱ्या गाड्या यांवर तिथल्या स्थानिकांचा रोजगार-व्यवसाय चालतो. पण ही संख्या घटल्याने आपोआपच व्यावसायीकांच्या आर्थिक गणितावर परिणाम झाला. या वेडींग प्लॅनिंग मधून होणाऱ्या व्यापार व्यवहारातून त्यांचा खर्च भागत असतो मात्र आता लॉडाउनमुळे हा सगळा व्यापार ठप्प झाला आहे. त्यातच स्थानिक प्रशासनाकडून डेस्टीनेशन वेडींगसाठी आणि शुट साठी इतर पर्यटन कंपनीच्या तुलनेत सर्विस चार्जेस जास्त घेण्यात येतो. साऊथ गोव्यामध्ये शांतता असते निवांत असते त्यामुळे तिथे प्रिवेडींग शुट मोठ्या प्रमाणात होते तर नॉर्थ गोव्यात डेस्टिनेशन वेडिंग मोठ्या प्रमाणात होते.

-नम्रता देसाई 

गेल्या वर्षीही अनेकांची लग्नं लॉकडाउनमुळे लग्नं लांबणीवर पडली होती. लॉकडाऊनमुळे बरेच लोकांनी लग्न पुढे ढकलले होते. वातावरण चांगले झाल्यास कार्यक्रम आयोजित करू असे लोकांना वाटत होते. मध्यंतरी निर्बंध शीथिल झाल्याने लोकांनी लग्न सोहळे उरकून घेतले. मात्र, ता पुन्हा कोरोनाचा प्रसार वाढत आहे. देशात आणि राज्यात पुन्हा लॉकडाउन लागण्याचे संकेत दिसत आहे. गोव्यात मध्यंतरी ओपन ग्राउंड कार्यक्रमाला 200 लोकांची परवानगी आणि घरगूती कार्यक्रमाला 100 लोकांची परवानगी गोवा सरकारने दिली होती परंतु आत लॉकडाउनमुळे तीही नाकारण्यात आली आहे. डिचोलीतील हिराबाई झांट्ये मोमोरिअल, कोमुनिदाद, श्री महामाया, शिरोडकर, मुळगावात श्री महालक्ष्मी रवळनाथ, कासारपालीत श्री संदिपक, सर्वणमधील श्री श्‍यामुरुष आदी हॉलही लग्नकार्यासाठी बुकींग करण्यात आले होते मात्र, मागील आठवड्यापासून कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढू लागल्याने त्यातच प्रशासनाने कडक निर्बंध जारी केल्याने ठरलेली शुभकार्ये उरकून घ्यावीत, की लांबणीवर टाकावीत. या विवंचनेत सध्या वधूवर मंडळी अडकलेली आहेत. 

लग्न सोहळ्यांवर टांगती तलवार

गोवा राज्यात लग्न म्हटलं की, लोकांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद बघायला मिळतो गोव्यात जास्तीत जास्त लग्नप्रसंग एप्रिल आणि मे या महिन्यात असतात. गोव्यात दर वर्षी स्थानिक आणि डेस्टीनेशन वेडिंग मोठ्या प्रमाणात होतात. पण, पुन्हा लागलेल्या कोरोना निर्बंधामुळे या लग्न सोहळ्यांवर टांगती तलवार लागली आहे. 

गोवेकरांनी जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यातच जास्तीत लग्न समारंभ आटपून घेतले आहे. जेव्हा कोरोना केसेस वाढत गेल्या तसतसे गोवेकरांमध्ये धास्ती निर्माण झाली. बाहेर देशात किंवा राज्यात असणारे नातेवाईक या लग्न प्रसंगांना उपस्थित राहू शकले नाही. गोव्यात येणाऱ्या लोकांना राज्य सरकारने कोणतीही अट घातली नसली, तरी इतर राज्यांमध्ये गोव्यातून जाणाऱ्या लोकांना कोविड निगेटिव्ह प्रमाणत्र अनिवार्य करण्यात आले आहे. बाहेरच्या देशातून आलेल्या नातलगांना 14 दिवस क्वॉरंटाइन राहावे लागले. त्या कारणाने काही लोकांनी लग्न समारंभ टाळले. काहीजण हजर झाले पण, आता परदेशात प्रवेशावर अटी असल्यामुळं काही नातेवाइक अजूनही गोव्यात अडकले आहे. या सगळ्या निर्बंधांचा परिणाम गोव्यातील विवाह समारंभावर झाला आहे.

निर्बंध पाळून झाले सोहळे

एवढं असुनही गोवेकरांनी सगळ्या नियमांचं पालन करून लग्न समारंभ पार पाडले. पण, यात विशेष बाब अशी की, गोवा सरकारने घातलेल्या अटीपेक्षा ही कमी लोकसंख्या या प्रसंगामध्ये बघायला मिळाली. निर्बंध पाळून हे विवाह सोहळे पूर्ण करण्यात आले. गोव्यात जास्तीत जास्त लग्न चर्चमध्ये किंवा मंदिरामध्ये होतात. तेव्हा देवस्थानांनीसुद्धा या नियमांचे कडक पद्धतीने पालन केले आहे. मात्र, या सगळ्या निर्बंधाची झळ थोड्या प्रमाणात का होइना वधू-वरांना आणि कुटूंबियांना सोसावी लागली आहे. निश्कर्षावरून या वर्षी गोव्यातील विवाह समारंभाची संख्या कमी झाली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रकोपामुळे काही लोकांनी जाणून लग्न प्रसंग टाळले तर काही लोकांनी पुढे ढकलले आहे. ख्रिश्चन पद्धतीने होणाऱ्या लग्न समारंभांवर लॉकडाउनचे असेच परिणाम झालेल बघायला मिळाले. कोणत्याही प्रकारचा मोठ्या प्रमाणात गाजावाजा न करता हे प्रंसंग चर्चमध्ये पार पडले. आणि तेही साध्या पद्दतीने. 

या संगळ्या प्रसंगावरून कोही गोष्टी लक्षात आल्या आहे. गोव्यातील जनता कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करत असून बाहेरून येणाऱ्या पर्यटकांमुळे गोव्य़ात कोरोना वाढत आहे, असे स्थानिकांचे मत आहे. कारण इतर राज्यात जातांना गोवेकरांना कोरोना नकारात्मक प्रमाणपत्र द्यावे लागत आहे, तेव्हा गोव्यात येणाऱ्यांवरसुद्धा गोवा राज्य सरकारने असे निर्बंध लावावे अशी मागणी स्थानिकांनी केली होती. आणि शेवटी गोवा सरकारने पाच दिसवासाठी लॉकडाउन जाहीर केलेआहे.

काय सुरु राहणार 

  • उद्योग धंदे सुरु राहणार आहे. 
  • किराणा दुकान सुरु राहणार 
  • अत्यावश्यक सेवा सुरु राहणार 
  • रेस्टोरंट ची फक्त पार्सल सेवा सुरु राहणार 
  • राज्यात अत्यावश्यक कामासाठी येण्यासाठी आणि बाहेर जाण्यासाठी RT-PCR test करणे अनिवार्य असणार आहे 
  • कारखाने उदयोग सुरू राहतील. 

        काय बंद राहणार 

  • सार्वजनिक वाहतूक बंद असणार 
  • कॅसिनो आणि बार बंद राहणार 
  • समुद्रकिनार्यावर - गोवा बीचवर नाइट आउटला मनाई
  • सामाजिक सांस्कृतिक आणि धार्मिक समारंभांवर बंदी असणार

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com