Goa Wedding Destination: गोव्यातील अशा हॉटेल्सबद्दल जाणून घेवूया

सध्या लग्नाचा सीझन सुरू झाला असून डेस्टिनेशन वेडिंकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
Goa Wedding Destination: गोव्यातील अशा हॉटेल्सबद्दल जाणून घेवूया
Goa Wedding Destination: गोव्यातील अशा हॉटेल्सबद्दल जाणून घेवूया Dainik Gomantak

प्रत्येकाची इच्छा असते की आपल्या लग्नाचा दिवस हा खास असावा. यासाठी अनेक लोक लग्नासाठी चांगली ठिकाणे निवडतात. सध्या डेस्टिनेशन वेडिंगचा ट्रेंड जरा जास्त वाढला आहे. यामध्ये समुद्रकिनारी विवाहसोहळा साजरा करण्याचा लोकांचा अधिक रस आहे. आज आम्ही तुम्हाला गोव्यातील बीच वेडिंगसाठी काही ठिकाणाबद्दल सांगणार आहोत, ज्याबद्दल तुम्हाळा माहिती असणे आवश्यक आहे.स्टेलर हॉस्पिटालिटीस्टेलर हॉस्पिटालिटी

* गोव्यातील बीच मॅरेज

गोवा हे केवळ एक उत्तम पर्यटन स्थळ नसून एक एक उत्तम वेडिग डेस्टिनेशन देखील आहे. गोव्यातील समुद्रकिनारे हे आकर्षणाचे केंद्र आहेत आणि अर्थातच सुंदर समुद्राभोवती विवाहसोहळे आयोजित केले जातात. डेस्टिनेशन वेडिगचा अनुभव घ्यायचा असेल, तर यापेक्षा चांगल ठिकाण काहीही असू शकत नाही.

* गोवा मॅरियट रिसॉर्ट आणि स्पा

गोवा मॅरियट रिसॉर्ट आणि स्पा हे विवाह सोहळ्याला खास बनवणारा आहे. येथे तुम्हाला सर्व सोय आणि व्यवस्था मिळतील. तसेच येथील स्टेलर हॉस्पिटालिटी आणि बीच या दोन्हीमुळे या ठिकाणाला गोव्यातील एक सर्वोत्तम ठिकाण बनवले आहे.

Goa Wedding Destination: गोव्यातील अशा हॉटेल्सबद्दल जाणून घेवूया
Hearty Brunch: गोव्यातील हे 4 कॅफे तुम्हाला माहिती आहेत का?

* लीला गोवा

लीला गोव्यात अरबी समुद्राच्या विस्तीर्ण भागाकडे एक लॉन आहे. येथील विवाहसोहळे आकर्षक होतात. हे ठिकाण चारही बाजूने नसर्गिक सौंदर्याने वेढलेले आहे. तुम्ही तुमचा विवाह सोहळा समुद्रकिनारी किंवा तलावाजवळ आयोजित करून हॉटेल्सच्या अप्रतिम सेवांमुळे तुमचे कार्यक्रम संस्मरणीय असेल.

* ग्रँड हयात गोवा

एक आलीशान हॉटेल आणि सुविधांचे जग म्हणजे ग्रँड हयात हॉटेल. येथील लग्न सोहळा एक खास आठवणी देवून जाते. येथील लग्न सोहाळ्यांचा विलक्षण क्षण तुमच्या आयुष्याच्या आठवणीत नेहमीच राहतील.

* ललित गोल्फ आणि स्पा रिसॉर्ट गोवा

स्वत: चा खाजगी समुद्रकिनारा असलेले हॉटेल हे स्वत: चे एक जग आहे आणि येथे विवाहसोहळा अगदी विलक्षण आहे. तुम्ही बीचसमोर, पूलसाइड किंवा तिथल्या लॉनमध्ये तुमचा लग्न सोहळा पार पाडू शकता. हे हॉटेल तुमच्या गरजेनुसार तयार केलेल्या कार्यक्रमसह एक संस्मरणीय दिवस देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करते.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com