पर्यटकांमुळे गोवा 'हाऊसफुल्ल', तिकीटाचे दर भिडले गगनाला

परतीच्या प्रवासासाठी मोजावं लागणार चौपट प्रवासभाडं, प्रवाशांच्या खिशाला कात्री
Tourist in Goa
Tourist in GoaDainik Gomantak

पणजी : गोव्यात सध्या पर्यटन हंगाम जोरात सुरु आहे. देशभरात कोरोना निर्बंध संपल्याने आता पर्यटकांची पावलं गोव्याकडे वळू लागली आहेत. या आठवड्यात सलगच्या सुट्ट्यांमुळे गोव्यातील किनारे गजबजले असून हॉटेल्सही फुल्ल झाल्याचं चित्र आहे.

गोव्यात येणाऱ्या पर्यटकांची संख्या अचानक वाढल्याने विमान, रेल्वेसह बस तिकिटांच्या किमतीतही मोठी वाढ झाल्याचं दिसत आहे. गुरुवारपासून ते रविवारपर्यंत सुट्टी असल्याने अनेक पर्यटक बुधवारी संध्याकाळीच गोव्यात दाखल झालेत. मात्र परतीच्या प्रवासासाठी पर्यटकांना तब्बल दुप्पट ते चौपट प्रवासभाडं भरावं लागत आहे.

Tourist in Goa
सलग सुट्ट्यांमुळे गोव्यातील समुद्रकिनारे गजबजले

सर्वसाधारण परिस्थितीत गोवा ते बंगळुरु, गोवा ते चेन्नई, गोवा ते मुंबईसाठी (Mumbai) जवळपास 3500 ते 4500 रुपये असणारं विमानाचं तिकीट आता 12 हजारांच्यावर पोहोचलं आहे. हैदराबादचं तिकीटही 3 हजारांवरुन 9500 रुपयांवर गेल्याचं चित्र आहे. गोवा कोलकाता विमानप्रवासासाठी लागणारं भाडं 6 हजारांवरुन 12,200 वर गेल्याचं दिसत आहे. गोव्यात प्रवास करण्यासाठीचे दर तुलनेने कमीच असल्याचं दिसत आहे, मात्र परतीच्या प्रवासासाठी मात्र प्रवाशांना चौपट भाडं मोजावं लागत आहे.

Tourist in Goa
गोव्यात अपघातांचं सत्र सुरुच, काणकोणमध्ये ट्रक पलटी

बंगळुरुतून गोव्यात (Goa) येण्यासाठीचं विमानाचं तिकीट 3500 वरुन 5300 झालं आहे, मात्र हे भाडं परतीच्या प्रवासासाठी लागणाऱ्या 12 हजार रुपयांपेक्षा खूप कमी आहे. इतकंच नाही तर 1500 ते 1800 रुपये असणारं गोवा- बंगळुरु बस तिकीट आता 2500 ते 3500 वर पोहोचलं आहे. नॉन एसी बससाठीही 2100 रुपये प्रवाशांना मोजावे लागत आहेत. गोवा मुंबई मार्गावरही सर्वसाधारणपणे 1200 ते 2000 रुपयांचं बस तिकीट आता 3800 ते 4000 रुपयांवर पोहोचल्याने पर्यटकांच्या खिशाला चांगलीच कात्री लागली आहे.

दरम्यान गोव्यात आल्यानंतर पर्यटक (Tourist) सर्वसाधारणपणे रेंट अ कार किंवा रेंट अ बाईकला पसंती देतात मात्र इतर दिवसांमध्ये 500 रुपये भाड्यामध्ये मिळणाऱ्या बाईकसाठी आता दुप्पट पैसे मोजावे लागत आहेत, तर रेंट अ कारसाठीही दुप्पट ते तिप्पट दर आकारला जात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com