गोवा वजनमापे खात्यातील नोकरभरतीत घोटाळा

गोव्यातील युवकांना नोकऱ्यांसाठी मोठ्या किमती मोजाव्या लागत आहेत
गोवा वजनमापे खात्यातील नोकरभरतीत घोटाळा
Girish Chodankar Dainik Gomantak

पणजी: राज्यात नोकरभरतीवेळी सरकारकडून घोटाळ्याचे प्रकार होत असल्याचे आरोप होऊनही भाजप सरकार सुधारत नाही. वजनमापे खात्यामध्ये निरीक्षकपदासाठी निवड झालेल्या मुख्यमंत्र्यांचे जवळचे संबंध असलेल्या तसेच खात्याच्या मंत्र्यांच्या दोन वैयक्तिक सहाय्यकांना (पीए) पैकीच्या पैकी गुण देऊन निवड झाल्याने यामध्ये घोटाळा झाल्याचे उघड झाले आहे. सरकारने त्यासाठी तडजोड केली आहे. त्यामुळे निरीक्षक पदे रद्द करून खात्याच्या मंत्र्यांना बडतर्फ करा, अन्यथा युवांना घेऊन काँग्रेस रस्त्यावर उतरण्याचा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी दिला आहे.

Girish Chodankar
प्लास्टिकमुक्तीचे कठोर पालन व्हावे

वजन मापे खात्यात रिक्त असलेल्या निरीक्षक पदासाठी सुमारे 1928 उमेदवारांनी अर्ज करून लेखी परीक्षा दिली होती. या लेखी परीक्षेला निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये वजनमापे खात्याचे मंत्री फिलीप नेरी रॉड्रिग्ज यांचे वैयक्तिक सहाय्यकांना (पीए) व मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातील त्यांचे जवळचे संबंध असलेल्या उमेदवाराला लेखी परीक्षेत 100 पैकी 100 गुण दाखविण्यात आले आहेत. त्यामुळे या परीक्षेसाठी बसलेल्या हुशार उमेदवारांचे खच्चीकरण करण्यात आले आहे. या निकालामुळे प्रामाणिकपणे परीक्षा दिलेले उमेदवार वैफल्यग्रस्त बनले आहेत. मंत्र्यांच्या उमेदवारांना रिक्त पदावर नेमणूक करण्यासाठी लेखी परीक्षेत घोटाळा करण्यात आला आहे. त्यामुळे इतर हुशार उमेदवारांवर अशा प्रकारामुळे अन्याय झाला आहे. या एकूण प्रकाराने नोकरभरती सुरू असलेल्या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश होत आहे. या सरकारने नोकऱ्यांची विक्री सुरू केली आहे, असा आरोप चोडणकर यांनी केला.

पदासाठी दिला मोठा मोबदला..!

निरीक्षक पदाच्या परीक्षेला पदवी तसेच पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार बसले होते. मात्र, ज्यांनी या पदासाठी मोठा मोबदला मोजला आहे तसेच जे कुणी मंत्र्यांच्या मर्जीतील आहेत त्यांना सर्वच्या सर्व गुण लेखी परीक्षेत मिळावेत यासाठी प्रश्‍नपत्रिकाच त्यांना देण्यात आल्याचा संशय आहे. या परीक्षेत सरकारने मर्जीतील उमेदवारांना सरकारी नोकऱ्या मिळाव्यात, यासाठी तडजोड केल्याचा आरोप चोडकणर यांनी केला.

Girish Chodankar
Goa Police: महिला, पर्यटकांच्‍या सुरक्षिततेला प्राधान्य

नोकऱ्यांसाठी मोजावी लागते ‘किंमत’

सध्या राज्यात विविध खात्यामध्ये मोठ्या प्रमाणात नोकरभरती सुरू आहे. मते मिळवण्यासाठी पाच वर्षांच्या काळ संपून ऐन तोंडावर आलेल्या निवडणुकीत मते मिळवण्यासाठी भाजप सरकारचा हा प्रयत्न आहे. नोकऱ्यांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांचा मंत्री व आमदार यांच्या घरी नेहमीच गर्दी होत आहे. उमेदवारांना आलेल्या कॉल लेटर्सच्या नकल प्रती घेऊन ठेवल्या जात आहेत व आश्‍वासने देण्याचे काम मात्र युद्ध पातळीवर या आमदार व मंत्र्यांकडून सुरू आहे. मात्र दुसऱ्या बाजूने या नोकऱ्यांसाठी मोठ्या किमती मोजाव्या लागत आहेत, असे गिरीश चोडणकर म्हणाले.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com