‘पर्यटकांचे स्वागत, पण नियम पाळा’

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 22 ऑक्टोबर 2020

टाळेबंदीनंतर आंतराज्य प्रवासी वाहतूक सुरू झाली, सीमा खुल्या झाल्या आणि जिवाचा गोवा करण्यासाठी किनारी भागात देशी पर्यटकांची गर्दी दिसत आहे. राज्यात पर्यटकांचे स्वागत आहे, पण त्यांनी नियम पाळावे, कोरोनापासून  स्वतःचा व इतरांचा बचाव करण्यासाठी मास्क वापरावा, असे मत स्थानिक पर्यटक व्यावसायिकांनी व्यक्त केले.

मोरजी : टाळेबंदीनंतर आंतराज्य प्रवासी वाहतूक सुरू झाली, सीमा खुल्या झाल्या आणि जिवाचा गोवा करण्यासाठी किनारी भागात देशी पर्यटकांची गर्दी दिसत आहे. राज्यात पर्यटकांचे स्वागत आहे, पण त्यांनी नियम पाळावे, कोरोनापासून  स्वतःचा व इतरांचा बचाव करण्यासाठी मास्क वापरावा, असे मत स्थानिक पर्यटक व्यावसायिकांनी व्यक्त केले.

पेडणे तालुक्यातील मोरजी, आश्वे-मांद्रे , हरमल व केरी तेरेखोल या किनारी भागात शनिवार रविवार आणि सुट्टीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात देशी पर्यटक पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी आणि दुधासारखा फेसाळणारा समुद्र किनारा पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात.

कोरोना महामारीचे नियम जे पाळत नाही, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यासाठी स्थानिक पंचायत पातळीवर पंचायत सचिव आणि पंचायत तलाठी यांना अधिकार दिले आहे. जो कोणीही मास्क वापरत नाही, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी, मात्र या अधिकाराचा उपयोग स्थानिक सचिव व तलाठी करत असल्याचे चित्र दिसत नाही.
एका बाजूने पर्यटकांना गोव्यातील किनारे सुरक्षित वाटत आहे. मात्र राज्यात आणि पर्यायाने पेडणे तालुक्यात सुद्धा कोरोना बाधितांचा संसर्ग वाढत असल्याचे चित्र दिसते. आंतरराज्य वाहतूक सेवा सुरू झाल्यामुळे कोण कुठून कोरोना राज्यात किनारी भागात घेऊन येईल हे सांगता येत नाही.

कलकत्ता येथील एक व्यावसायिक नितीशकुमार बर्मन यांनी प्रतिक्रिया देताना गोवा सुरक्षित वाटत होता, राज्यात अनेक बिगर गोमंतकीय कामधंद्यानिमित्ताने राज्यात स्थायिक झालेले आहे. कोरोनाची भीती राज्यात लॉकडावून काळात तेवढी वाटत नव्हती, मात्र आंतराज्य प्रवासी सेवा सुरू झाल्याने कोरोनाची अधिक भीती असल्याची प्रतिक्रिया श्री बर्मन यांनी व्यक्त केली. हॉटेल व्यवसायांत कर्मचारी ७५ टक्के बाहेरचे बंगाल, ओरिसा, नेपाल या भागातील आहेत, आता सर्व कामगार बेकार आहेत. गोव्यातही बेकार आहेत.

संबंधित बातम्या