Goa: बुद्धिबळपटू ग्रँडमास्टर लिऑनचे गोव्यात आगमन

कोविड-19 निर्बंधामुळे वडिलांसह युरोपात दीड वर्षे अडकला
ग्रँडमास्टर लिऑन मेंडोसा याचे विमानतळावर स्वागत करताना तिसवाडी तालुका बुद्धिबळ संघटनेचे पदाधिकारी.
ग्रँडमास्टर लिऑन मेंडोसा याचे विमानतळावर स्वागत करताना तिसवाडी तालुका बुद्धिबळ संघटनेचे पदाधिकारी.Dainik Gomantak

पणजी: गतवर्षी मार्चमध्ये युरोपातील (Europe) बुद्धिबळ (chess) स्पर्धेत खेळण्यास गेलेला गोव्याचा युवा बुद्धिबळपटू लिऑन मेंडोंसा वडिलांसमवेत कोरोना विषाणू (Covid-19) महामारी निर्बंधामुळे तेथेच अडकला. त्या कालावधीत आवश्यक तिन्ही नॉर्म मिळवून त्याने देशाचा 67वा ग्रँडमास्टर बुद्धिबळपटू हा मान मिळविला, पण मायदेशी परतण्यासाठी त्याला तब्बल दीड वर्षे प्रतीक्षा करावी लागली.

ग्रँडमास्टर लिऑन मेंडोसा याचे विमानतळावर स्वागत करताना तिसवाडी तालुका बुद्धिबळ संघटनेचे पदाधिकारी.
Goa: "मोफत पाणी नाही हे आता लोकांनाही कळून चुकले आहे" विजय सरदेसाई यांचे विधान

अखेरीस लिऑन आणि त्याचे वडील लिंडन यांचे गुरुवारी आगमन झाले. त्यावेळी त्यांचे राज्यातील बुद्धिबळप्रेमींनी जोरदार स्वागत केले. दाबोळी विमानतळावर तिसवाडी तालुका बुद्धिबळ संघटना, तसेच गोवा बुद्धिबळ संघटनेचे पदाधिकारी, बुद्धिबळप्रेमी त्याच्या स्वागतास उपस्थित होते.

ग्रँडमास्टर लिऑन मेंडोसा याचे विमानतळावर स्वागत करताना तिसवाडी तालुका बुद्धिबळ संघटनेचे पदाधिकारी.
Goa: गोवा माईल्स व पर्यटन टॅक्सी मीटर प्रकरणी पणजीत धरणे आंदोलन

लिऑन हा गोव्यातील सर्वांत युवा बुद्धिबळ ग्रँडमास्टर आहे. गेल्या वर्षी डिसेंबरअखेरीस इटलीतील स्पर्धेत त्याने या किताबासाठी आवश्यक तिसरा नॉर्म प्राप्त केला. कोविड-19 लॉकडाऊनमुळे गेल्या वर्षी मार्च महिन्यापासून युरोपात अडकल्यानंतर तेथील स्पर्धेत खेळत त्याने स्वप्नपूर्ती केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com