गोव्यातील उच्चशिक्षित तरुणाची दूग्धव्यवसायातून बक्कळ कमाई

सरकारी नोकरीच्या मागे न धावता युवकांनी दूध व्यवसायात उतरण्याचं आवाहन
Milk Production Success Story in Goa
Milk Production Success Story in GoaDainik Gomantak

मोरजी : उच्च शिक्षण पदरी असूनही सरकारी नोकरीच्या मागे न धावता पत्रादेवी-पेडणे येथील सावळ यांनी दूध व्यवसाय करण्यासाठी वेगवेगळ्या जातीच्या गायींचे पालन केले आहे. यातून दिवसाला 170 लीटरपर्यंत दूध ते दररोज दूध सोसायटीला देतात. सरकारी नोकरीच्या मागे न लागता दूध व्यवसायात सक्रिय व्हा, असे आवाहन पत्रादेवी येथील सुशिक्षित दूध व्यावसायिक राजेंद्र ऊर्फ बाबी सावळ यांनी गोमंतकीय तरुणांना केलं आहे.

Milk Production Success Story in Goa
चोडण बेटावर दिवसाआड पाणीपुरवठा; लोकांचे हाल

बाबी सावळ यांनी आपल्या गोठ्यामध्ये गावठी गायींबरोबरच संकरित गायी त्यात जर्सी व इतर जातीच्या गायींचे पालन केलेले आहे. त्यांची व्यवस्थित निगा राखणे, औषधपाणी करणे, त्यांना स्वच्छ आणि मोकळी हवा मिळावी, केवळ गोठ्यात बांधून न ठेवता त्यांना मुक्त गोठ्यात जागा उपलब्ध करून द्यावी यावर ते विशेष लक्ष देतात. आपण जसा दूध व्यवसाय केला त्याच पद्धतीने आपला मुलगाही त्यात रमत असल्याने आपल्याला अत्यानंद होत असल्याचे सावळ यांनी सांगितले.

Milk Production Success Story in Goa
सांगोल्‍डा येथील ‘फूड बँक फॉर पुअर’तर्फे अन्नदान

कोरोनाच्या काळात दूध व्यवसायावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला. त्या काळात चारा आणि गायींना लागणारे खाद्य परराज्यातून आणावे लागत होते. परंतु कोरोना काळात माल आणताना मोठ्या अडचणी आल्यामुळे आपण काही गाई विकल्या आणि आता कोरोना संपुष्टात येण्याच्या मार्गावर असताना पुन्हा नवीन जातीच्या गाई आणल्या आहेत. शिवाय एखाद्या गावठी गायीची आपण व्यवस्थित निगा राखली तर तीसुद्धा दिवसाला 10 ते 15 लीटर दूध देऊ शकते, हे आपण सिद्ध याचे सावळ म्हणाले.

सरकारने गाईवर अनुदान देण्यापेक्षा दुधावर अनुदान देऊन दूध उत्पादन वाढवण्यासाठी सहकार्य करायला हवे. काही व्यापारी केवळ गाईवर अनुदान घेतात आणि गाईंची योग्य ती निगा राखत नसल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com