Ambergis: गोव्यातून कोल्हापूरात जाणारी दोन कोटींची व्हेल माशाची उलटी जप्त; सिंधुदुर्ग, गोव्यातील सहाजणांना अटक

घाटकरवाडी परिसरात तस्करीच्या हेतूने नेण्यात येणारी सुमारे दोन किलो वजनाची दोन कोटी रुपये किमतीची व्हेल माशाची उलटी जप्त करण्यात आली.
Ambergis or Grey Ambe
Ambergis or Grey AmbeDainik Gomantak

आजरा पोलिस व वनविभागाने संयुक्त कारवाई करत दोन कोटी रुपये किमतीची व्हेल माशाची उलटी (अ‍ॅम्बरग्रीस) (Ambergis or Grey Amber) जप्त केली आहे. रात्री उशीरा ही कारवाई करण्यात आली असून संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे.

Ambergis or Grey Ambe
Old Goa Murder Case : त्या 12 वर्षीय मुलीचा पित्यानेच 'का' केला खून; धक्कादायक कारण आले समोर

मिळालेल्या माहितीनुसार, घाटकरवाडी (ता. आजरा) परिसरात तस्करीच्या हेतूने नेण्यात येणारी सुमारे दोन किलो वजनाची दोन कोटी रुपये किमतीची व्हेल माशाची उलटी जप्त करण्यात आली.

या कारवाईत सिंधुदुर्ग व गोवा (Sindhudurg And Goa) येथील सहाजणांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्याचे काम आजरा पोलिसांत (Kolhapur Police) रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

Ambergis or Grey Ambe
Crime: फोंडा तालुक्यात सर्वाधिक चोऱ्यांच्या घटना

शनिवारी दुपारी आजर्‍याचे सहायक पोलिस निरीक्षक सुनील हारूगडे यांना गोव्याहून व्हेल माशाची उलटी आजरामार्गे तस्करीसाठी येणार असल्याचे समजले. त्यांच्यासह गडहिंग्लज उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. राजीव नवले, पोलिस उपनिरीक्षक युवराज जाधव, प्रशांत पाटील, विशाल कांबळे, अजित हट्टी, भाग्यश्री चौगुले, आजरा वनपरिक्षेत्र अधिकारी स्मिता डाके यांचे पथक आजरा-आंबोली मार्गावर तैनात करण्यात आले.

अत्यंत महाग असते व्हेल माशाची उलटी!

व्हेल माशाच्या शरीरातून निघालेला अ‍ॅम्बरग्रीस (उलटी) हे अत्तर किंवा सुगंधित उत्पादनात वापरतात. जगभरात अत्तर हे लाखोच्या किमतीनें विकले जाते. त्यात अ‍ॅम्बरग्रीस (व्हेल माशाची उलटी) यापासून तयार केलेल्या अत्तर कोट्यवधींना विकत घेतले जाते. एवढेच नाही तर अ‍ॅम्बरग्रीसपासून अगरबत्ती आणि धूपही तयार केले जाते. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com