Panjim Smart City| गटारे तुंबतात त्याचे काय? मडकईकरांचा सवाल

फुर्तादो-मडकईकर : स्मार्ट सिटीतर्फे प्रकल्पाचे सादरीकरण
Panjim
Panjim Dainik Gomantak

पणजी: अमृत योजनेंतर्गत स्मार्ट सिटीसाठी मंजूर झालेल्या 60 कोटी रुपयांच्या कामाला सेंट्रल पणजीमध्ये सुरवात होणार आहे. त्याअंतर्गत निश्‍चित केलेल्या मार्गावर युनिव्हर्सल पदपथ निर्माण होणार आहेत. त्या पदपथांचे सादरीकरण शुक्रवारी महापालिकेत इमेजिन पणजी स्मार्ट सिटी विकास लिमिटेडच्या (आयपीएससीडीएल) अभियंत्यांनी केले. त्यावर माजी महापौर तथा नगरसेवक उदय मडकईकर आणि सुरेंद्र फुर्तादो यांनी जोरदार आक्षेप नोंदविला.

(What about clogged drains in panjim Madkaikar's question)

Panjim
Goa Agriculture| नैसर्गिक शेती उपक्रम लवकरच सुरू करणार; मुख्यमंत्री प्रमोद सावंत

महापालिकेच्या सभागृहात सकाळी दोन तास चाललेल्या या बैठकीस महापौर रोहित मोन्सेरात, उपमहापौर संजीव नाईक, आयुक्त आग्नेलो फर्नांडिस, सत्ताधारी गटाचे काही व विरोधी गटाचे फुर्तादो व मडकईकर हे नगरसेवक, महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीविषयी मडकईकर यांनी सांगितले की, पदपथ निर्माण करण्यास आमचा काहीच अटकाव नाही, परंतु शहरातील गटारे तुंबतात, त्यावर उपाय काय तो काढा आणि मगच ते काम करा, असा सल्ला आम्ही दिला. कारण काही वेळ जोरदार पाऊस झाला तर पणजी शहरात पाणी साचून राहते. अगोदरच गटाराला अटकाव करणाऱ्या अनेक वाहिन्या आडव्या गेलेल्या आहेत. त्यात पाणी, वीज, विविध कंपन्यांच्या वाहिन्या गेल्याने त्यामध्ये कचरा साचून राहण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे पाण्याला गटारातून व्यवस्थित वाट न मिळाल्याने पाणी साचून राहते, असे प्रकार सतत घडतात, हे स्मार्ट सिटीच्या अभियंत्याच्या निदर्शनास आम्ही आणून दिले. अगोदर या वाहिन्या हटवून मगच पदपथ निर्माण करावेत, अशी सूचना आम्ही मांडली. त्यावर त्यांच्याकडून काहीही आश्‍वासन मिळाले नाही. त्या दरम्यान, वीज व साबांखाच्या अभियंत्यांनाही बोलावून घेऊन वस्तूस्थिती काय ती सांगण्यात आली.

Panjim
Crocodile In Goa: सांताक्रूझच्या हद्दीतील शेत तळ्यात मगरीचा वावर

शहरातील महत्त्वाच्या मार्गावर घालण्यात येणारा पदपथ एकाच आकाराचे आणि त्याचे साहित्यही एकाच रंगाचे असणार आहे. यामुळे त्या सर्व रस्त्याच्या मार्गांचा लूक एकसारखा दिसणार आहे, असे उपमहापौर संजीव नाईक यांनी सांगितले.

मंजूर निधी परत जाण्याची चिंता

मिळालेल्या माहितीनुसार, माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्येकर यांच्या काळात स्मार्ट सिटीसाठी मंजूर झालेले या कामाचे 60 कोटी रुपये मार्च 2023 पर्यंत खर्च करावयाचे आहेत, त्यासाठी सेंट्रल पणजीतील पदपथाचे काम हाती घेतले गेले आहे. जर हे काम सुरू झाले नाही, तर ती रक्कम परत केंद्र सरकारकडे जाण्याची शक्यता आहे. त्यासाठीच हा पदपथ निर्मितीच्या कामासाठी महापालिकेकडून मंजुरी मिळवायचा प्रयत्न आहे, परंतु पणजीतील गटार व्यवस्था व्यवस्थित नसल्याने पाणी साचण्याचे प्रकार घडत आहेत. समुद्र भरतीचे कारण सांगितले जात असले तरी गटार व्यवस्था सुधारणा गरजेचे आहे, हा प्रश्‍न वारंवार पुढे आलेला आहे. गटार व पदपथ निर्मितचे काम एकावेळी करणे शक्य आहे, पण त्यासाठी स्मार्ट सिटीला आणखी काही रक्कम खर्चासाठी वाढवून घेणे अपेक्षित आहे, असे एका अभियंत्याने सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com