रोजंदारी कामगारांच्या दैनंदिन जीवनाचे काय?

गोमंन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 4 मे 2021

गोवा राज्यासह महाराष्ट्र व कर्नाटकमध्येही कोरोना नियंत्रणासाठी  लॉकडाऊन सुरू करण्यात आला आहे. लॉकडाऊनमुळे गोव्याबाहेर आपल्या मूळ गावी जाण्यासाठी किंवा गोव्याबाहेर तातडीच्या कामासाठी जाणाऱ्या कामगारांना आंतरराज्य बससेवा बंद असल्यामुळे बराच त्रास सहन करावा लागत आहे.

पणजी: गोवा(Goa) राज्यासह महाराष्ट्र(maharashtra) व कर्नाटकमध्येही कोरोना नियंत्रणासाठी  लॉकडाऊन सुरू करण्यात आला आहे. मात्र, त्याचा सर्वात जास्त फटका रोजंदारी कर्मचाऱ्यांना(laborers) बसला आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात परराज्यातून आलेले कामगार रोजंदारीवर विविध ठिकाणी काम करत होते. दुकानांमध्ये किंवा मॉलमध्ये काम करणाऱ्यांची दुकाने व मॉल बंद असल्याने सध्या रोजंदारी बंद झाली आहे.  उद्योग क्षेत्रात काही उद्योग सुरू आहेत. मात्र, तेथेही जे कामगार सेवेत कायम आहेत त्यांनाच बोलावण्यात येत असून 50 टक्के  उपस्थितीचा नियम पाळण्यासाठी रोजंदारी कर्मचाऱ्याला डावलण्यात येत आहे. दुसरीकडे जे गरीब कामगार बसमधून उद्योग कारखान्यात कामाला जात होते त्यांना बसगाड्या बंद असल्याचा फटका बसलेला आहे.(What about the daily life of day laborers in Goa)

गोव्यात नाइट पार्ट्या सुरू असल्याने किनारपट्टी भागात ड्रग्ज व्यवसाय जोमात 

दुचाकीस्वार भीतीने लिफ्ट देइना

दुचाकीस्वार कोरोनाच्या भीतीने कोणालाही लिफ्ट देत नसल्यामुळे अनेक कामगारांना खोलीवरून चालत आपल्या कामाच्या ठिकाणी जावे लागत आहे, तर रोजंदारी कर्मचाऱ्यांना रोजंदारी बुडाल्यामुळे आता पुढील दहा दिवस पुन्हा एकदा खोलीत बसूनच आपले दैनंदिन जीवन कसे व्यतीत करावे? याची काळजी सतावत आहे.

लॉकडाऊनमुळे(Lockdown) गोव्याबाहेर आपल्या मूळ गावी जाण्यासाठी किंवा गोव्याबाहेर तातडीच्या कामासाठी जाणाऱ्या कामगारांना व नागरिकांना आंतरराज्य बससेवा बंद असल्यामुळे बराच त्रास सहन करावा लागत आहे.  चोर्लाघाट किंवा दोडामार्ग, राममनगर - लोंढा या भागांमध्ये जाणाऱ्‍यांना बसेस उपलब्ध नसल्यामुळे त्यांना भाजीच्या टेम्पोचा आधार घेऊन किंवा इतर माध्यमातून जावे लागत आहे. महाराष्ट्रामध्ये जाण्यासाठी तेथे कोरोना तपासणीचे प्रमाणपत्र मागितले जात असल्यामुळे जे  गोव्यात कामाला ये जा करत होते त्यांनाही बराच त्रास सहन करावा लागत आहे. 

भाजपवासी 10 आमदार अस्वस्थ; गोवा मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होण्याची शक्यता 

जीवनावश्यक वस्तुंची दुकाने सकाळी सात ते संध्याकाळी सात या काळामध्ये सुरू करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. मात्र, संध्याकाळी जे आमलेट पावचे  गाडे लावत होते, फास्ट फूड गाडे चालवत होते त्यांची कुचंबणा झालेली आहे. सात वाजता दुकान किंवा गाडे बंद करावा लागणार असल्यामुळे त्यांनी आपले गाडे व फास्ट फुडची दुकाने उघडणेच बंद केले आहे. अशाप्रकारे दररोजच्या कमाईवर जगणाऱ्यांना कोरोना संकटामुळे बराच त्रास सहन करावा लागत असून त्यांचे कमाईचे साधनच सध्या बंद झालेले आहे.  

Goa Lockdown: वास्को-मुरगावात राहणाऱ्या मजुरांनी धरला गावचा रस्ता

कदंब महामंडळाने 50 टक्के बसेस सुरू असणार असे जरी सांगितले असले तरी रस्त्यावर प्रवासी नसल्याचे कारण देऊन अवघ्या काही बसेसच त्यांनी सुरू ठेवलेल्या आहेत. या बसची वेळ प्रवाशांना माहीत नसल्यामुळे त्या बसेसचा फायदा त्यांना होताना दिसत नाही. एकंदरीत  कोविड निर्बंध असो किंवा लॉकडाऊन असो हे सर्वसामान्य रोजंदारी कामगारांना व सर्वसामान्य नागरिकांना बरेच त्रासदायक ठरत असून कोरोना नियंत्रणात ठेवण्यासाठी जरी हे निर्बंध लादले गेलेले असले तरी या रोजंदारी कामगारांच्या दैनंदिन जीवनाचे  काय? हा प्रश्न उपस्थित होत आहे.

गोव्यात काय सुरु आणि काय बंद ? पाहा व्हिडीओ ..

संबंधित बातम्या