काय आहे तरुण तेजपाल प्रकरण? वाचा सविस्तर 

tarun tejpal.jpg
tarun tejpal.jpg

लैंगिक अत्याचार प्रकरणी तहलका मासिकाचे संपादक तरुण तेजपाल याच्याविरुद्ध आज म्हापसा येथील जिल्हा न्यायालयात सुनावणी पार पडली. मात्र न्यायालयाने आजही या प्रकरणाचा अंतिम निकाल पुढील बुधवारपर्यंत (ता.19) तहकूब केला आहे. कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे या प्रकरणाचा निकाल 19 मे पर्यंत राखून ठेवण्यात आल्याचे न्यायाधीश शमा जोशी यांनी स्पष्ट केले आहे.  (What is the case of Tarun Tejpal? Read detailed) 

सुमारे सात वर्षांपूर्वी २०१३ मध्ये गोव्यातील बांबोळी येथील एका तारांकित हॉटेलमध्ये झालेल्या ‘थिंक फेस्टिव्हल’मध्ये तरुण तेजपाल याच्या महिला सहकाऱ्याने महिला लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार केली होती. तेव्हा या प्रकरणाची चांगलीच चर्चा रंगली होती. मात्र आजही अनेक जणांना या प्रकरणाची माहिती नाही. 

नक्की काय आहे हे प्रकरण? याच प्रकरणाचा एक आढावा.  

-2013 मध्ये गोव्यातील बांबोळीत एका पंच तारांकित हॉटेलमध्ये झालेल्या ‘थिंक फेस्टिव्हल’मध्ये तरुण तेजपालने लैंगिक अत्याचार केले, अशी तक्रार एका महिलेने सहकाऱ्याने केली होती. महिलेने केलेल्या तक्रारीची दखल घेत ते प्रकरण अतिशय संवेदनशील असल्याने त्याचा तपास क्राइम ब्रांचकडे सोपवण्यात आला होता.

-तरुण तेजपालने आपल्यावर लावलेले सर्व आरोप फेटाळून लावले. इतकेच नव्हे तर गोव्यातील भाजप सरकारने राजकीय दबावाखाली आपल्याला या जाळ्यात अडकवल्याचा आरोपही त्याने केला. 

- त्यानंतर तरुण तेजपालला 30 नोव्हेंबर 2013 रोजी बलात्कार प्रकरणात अटक करण्यात आली होती.  काइम ब्रांचच्या तत्कालीन निरीक्षक तथा विद्यमान पोलिस उपअधीक्षक सुनिता सावंत यांनी त्या प्रकरणाचा तपास करून तेजपाल याच्याविरोधात आरोपपत्र सादर केले होते.  फेब्रुवारी 2014 मध्ये विशेष गुन्हे शाखेने 2846 पानांचे आरोप पत्र सादर करत तरुण तेजपाल यांच्यावर गुन्हा दाखल केला आणि त्यांना अटक केली.  मात्र फेब्रुवारीमध्येच त्यांची जामिनावर सुटका झाली. 

- तरुण तेजपालवर भारतीय दंड संविधान कलमानुसार  एखाद्या व्यक्तीवर जबरदस्ती करणे, अडवणूक करणे, लैंगिक छळ,  प्राणघातक हल्ला किंवा गुन्हेगारी शक्तीचा वापर, बलात्कार करणे नियंत्रणात ठेवणे असे अनेक गुन्हे दाखल करण्यात आले. गुन्हे शाखेच्या तत्कालीन निरीक्षक सुनिता सावंत यांनी या प्रकरणाचा तपास करून तेजपाल याच्याविरोधात आरोपपत्र सादर केले. या खटल्यावरील सुनावणी इन कॅमेरा घेण्यात आली होती. या खटल्याची सुनावणी लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावी असे निर्देश यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिले होते.

- या खटल्यावरील सुनावणीवेळी बचाव पक्षातर्फे चार जणांच्या साक्षी नोंदवल्या होत्या. तसेच, इतर किमान ८० जणांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या. या प्रकरणाचा तपास सुरू असताना तेजपालने जिल्हा व सत्र न्यायालयात व उच्च न्यायालयातही जामिनासाठी अर्ज केला होता. अखेरीस खटल्याची सुनावणी प्राधान्यक्रमाने घेऊन पूर्ण करण्याचे निर्देश देत सर्वोच्च न्यायालयाने तरुण तेजपालला  सशर्त जामीन मंजूर केला. 

- त्यानंतर 29  सप्टेंबर 2017  रोजी न्यायालयाने तरुण तेजपालवर बलात्कार, लैंगिक छळासह अनेक कलमांवरील आरोप निश्चित केले. न्यायालयात आरोप निश्चित झाल्यानंतर तरुण तेजपाल यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आणि आपल्यावरील आरोप फेटाळून लावावेत अशी मागणी केली. परंतु सर्वोच्च न्यायालयाने याचा नकार दिला आणि न्यायालयाला खटला चालविण्याचा आदेश दिला. दरम्यान मागील वेळी झालेल्या सुनावणीत अंतिम निकाल राखुन ठेवण्यात आला होता. यापूर्वी 8 मार्च, 27 मार्च, 12 मे रोजी या प्रकरणाची सुनावणी झाली होती. मात्र निकाल राखून ठेवण्यात येत होता. त्यानंतर आज झालेल्या सुनावणीतही अंतिम निकाल 19 मे पर्यंत स्थगित करण्यात आला आहे.  त्यामुळे 19 मे रोजी होणारी सुनावणी महत्त्वाची मानली जात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com